बिलोली: प्रतिनिधी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरूड ता. जि. लातूर द्वारा संचलित, शिक्षक अधिकारी व कर्मचारी 2025-26 विभागस्तर स्पर्धेत कस्तुरबा गांधी कन्या विद्यालय बिलोली येथील उपक्रमशील शिक्षिका सौ. आश्विनी कोतवाड मॅडम यांनी विभागीय स्तरावर वक्तृत्व स्पर्धेत दैदीप्यमान यश संपादन करून रायगड येथे होऊ घातलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सौ. अश्विनी कोतवाड मॅडम म्हणजे एक उपक्रमशील व प्रयोगशील शिक्षिका म्हणून त्यांचा शाळेमध्ये नावलौकिक आहे. अत्यंत विद्यार्थिनी प्रिय असलेल्या त्या शिक्षिका आहेत. आपल्या विषयावर प्रभुत्व व विद्यार्थी हेच आपले सर्वस्व मानणाऱ्या कोतवाड मॅडम आहेत. विविध स्पर्धेची, वक्तृत्व स्पर्धेची, शिष्यवृत्तीची तयारी अशा विविध उपक्रमात ते हिरीरीने भाग घेतात. साधन व्यक्ती म्हणून त्यांनी राज्यस्तरापर्यंत कार्य केले आहे विद्यार्थी हेच आपले दैवत म्हणून सतत विद्यार्थ्यांचा ध्यास हा त्यांचा असतो. सुट्टी असो वा शाळा सतत कार्य मग्न हाच ध्यास त्यांचा असतो. नुकत्याच संपन्न झालेल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरूड ता. जि. लातूर द्वारा संचलित, शिक्षक अधिकारी व कर्मचारी विभागस्तर स्पर्धेत विभागीय स्तरावर दैदीप्यमान यश संपादन करून रायगड येथे होऊ घातलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी बी. एम. पाटील, कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी यांनी सौ.अश्विनी कोतवाड मॅडम यांचे अभिनंदन केले आहे.

