कंधार ;( दिगांबर वाघमारे )
कंधार नगरपालीकेचा निकाल जाहीर झाला असून नगराध्यक्षपदी शहाजी अरवविंदराव नळगे यांनी बाजी मारली आहे.त्यांना आठ हजार सातशे ६० मते पडली तर स्वप्नील लुंगारे यांना सहा हजार चारशे ११ मते पडली असून शहाजी नळगे यांचा दोन हजार तिनशे ४९ मतानी विजयी झाले आहे .
कंधार नगरपालिका निवडणूक आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध माजी नगराध्यक्ष अरविंदराव नळगे यांच्यात झाल्याने प्रतिष्ठेची झाली होती.त्यात भाजपा ने संपूर्ण उमेदवार दिले होते.परंतू भाजपाची फिल्डींग तेवढी लागली नसल्याने व वरिष्ठ राजकीय पुढाऱ्यांनी प्रचाराकडे पाठ फिरवल्याने भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अड गंगाप्रसाद यन्नावार यांना केवळ एकहजार सातशे ७४ मते पडली.चिखलीकर गटाचे उमेदवार स्वप्नील पाटील लुंगारे यांचा दारून पराभव झाला.परंतू आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे नगरसेवक पदाच्या १० जागा निवडून आल्या आहेत तर विजयी उमेदवार शहाजी नळगे यांच्या काँग्रेस गटाच्या केवळ ५ जागा निवडल्या आहेत त्यामुळे कंधारच्या नगरपालीकेवर स्पष्ट बहुमत मिळले नसल्याने अपक्ष उमेदवार व इतर उमेदवारावरच आता मदार आहे .
कंधार नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 विजयी उमेदवाराचे नाव ; काँग्रेस चे नळगे शहाजी अरविंदराव ८७६०, नगरसेवक बसवंते वैशाली दिलीप (५९६),पवार सुनिता दिलीप(१२६४),बनसोडे देऊबाई रामराव (८५६),नळगे भास्कर अरविंदराव(१००४),कांबळे सुधाकर मरीबा(७२१) तर कॉग्रेस आघाडीतील वंचित बहुजन आघाडी चे
देशमुख दिलीप संतराम (९७०),शिवसेना (शिंदेगट ) पिनाटे महेश नामदेव (३९४) मनोहर धोंडे यांच्या
सेवाजन शक्ती पार्टीचे मयुर नळदकर विजयी झाले असून त्याना ६७७) मते पडली त्यांनी कांग्रेस चे कंधार तालुकाध्यक्ष संजय भोसीकर यांची भावजय सौ संजीवनी राजेंद्र भोसीकर यांचा दारून पराभव केला.त्यांना(५२७) मते पडली .आणि अपक्ष उमेदवार म्हणून थांबलेले माजी नगराध्यक्ष दगडूभाऊ सोनकांबळे यांचे चिरंजीव राजू दगडू सोनकांबळे यांना(६४६) मते पडली.दुसरा अपक्ष उमेदवार कांबळे मेघा सुहास (६४६)
तर राष्ट्रवादी चे 10 उमेदवार निवडून आले पैकी मोहम्मद जफरोद्दिन (६२५),परवीन तबस्सुम मोहम्मद जफरोद्दिन(९१९),अब्दुल मन्नान म. सरवर(१०८९),शेख खैसरबेगम इस्माइल(९२६),म. समिरउल्ला अमिरउल्ला (९५७),कदम प्रकाश भगवानराव (१३८१),पठाण परविन बेगम रेहमतउल्लाखॉन
(११८०),कांबळे कविता कैलास (८९७),शेख अजमेरी अब्दुल (८८२) केंद्रे अनुराधा चेतन(४१८)अशी मते मिळाली आहेत.यामध्ये डॉ दिपक बडवणे ,बंडू कांबळे,सौ.वर्षा गणेश कुंटेवार,निलेश मनोजसिंग गौर ,बालू पवार आदी नामाकिंत उमेदवाराचा बोटावर मोजण्याच्या मताने पराभव झाला.

