धर्मापुरी ( प्रा राहुल गायकवाड)
येथील कै शंकरराव गुट्टे ग्रामीण महाविद्यालयातील प्रा नारायण संभाजीराव चाटे यांना इतिहास विषयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर विद्यापीठाने पि एचडी प्रदान केली .त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. गेली पंचवीस वर्षापासून ते शंकरराव गुट्टे महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामातील लष्करी कॅम्प : एक चिकित्सक अभ्यास या विषयावर वैजनाथ महाविद्यालय परळी येथील डॉ बी के शेप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगरला सादर केला होता .त्यास मान्यता मिळाली असून मौखिक परीक्षा शनिवार दि २० डिसें २५ रोजी घेण्यात आली.
त्यांना विद्यापीठांने पीएचडी बहाल केली .त्यांच्या यशाबद्दल जय भगवान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, प्राचार्य ताराचंद होळंबे, संभाजी आंबेकर (ओ एस ) कार्याध्यक्ष प्रताप गुट्टे, डॉ दगडू शिरसाट , डॉ सुरेश चाटे ,प्रा शिवाजी मुंडे, प्रा प्रकाश देशमुख, प्रा अंगद फड, प्रा अविनाश मुंडे ,प्रा राहुल गायकवाड आणि सर्व प्राध्यापक – प्राध्यापिका प्राध्यापकेत्तर कर्मचार्यानी त्यांचे अभिनंदन केले आहे.

