हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे सवंगडी स्वतःचा जीव धोक्यांत घालून स्वराज्यासाठी प्राणपणाने लढले.प्रत्येक वेळी त्यांनी कुटुंबा पेक्षा स्वराज्यचे संरक्षण केले. पहिले प्राधान्य त्यांनी राष्ट्रहिताला दिले.अगोदर लग्न कोंढाण्याचे नंतर रायबाचे,एवढी मोठी निष्ठा त्यांची स्वराज्यावर होती.बचेंगे तो और भी लडेंगे अशी दत्ताजी शिंदे म्हणाले. त्यामुळे त्यांची राष्ट्रनिष्ठा वाखण्याजोगी होती. म्हणूनच या ठिकाणी आलेले परकीय मुघल, आदिलशाही,निजामशाही, कुतुबशाही,इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगीज यांना पिटाळून लावण्याचे काम या ठिकाणच्या नेतोजी पालकर व प्रतापराव गुजर या सरसेनापतींनी व सैनिकांनी केले. शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर झालेले पहिले सरसेनापती हौसाजी तथा हंबीरराव मोहिते यांची राष्ट्रनिष्ठा वाखण्याजोगी होती.नुकताच 16 डिसेंबर रोजी त्यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला त्या निमित्ताने…
आज समाजात संपत्तीसाठी व एखाद्या जवळच्या पाहुण्यांचा कारभार असलेल्या ठिकाणी उच्च पद मिळवण्यासाठी खोटे बोलून ते हस्तगत करत आहेत. किंवा आमिषाला बळी पडून चुकीचा निर्णय घेताना दिसत आहेत.
सगे-सोयरे एकमेकांना सहकार्य करून उच्च पद मिळवून देत ही आहेत.खोट्या प्रतिष्ठा पणाला लावून बळजबरीने पदे हिसकावून घेताना काही व्यक्ती दिसतात
.समाजामध्ये आम्ही फार कर्तबगार,शूरवीर आहोत.
असा भास निर्माण करताना ही आढळून येतात. त्यामुळे तर वशिल्याचे…. काशीला जातात.
ही गोष्ट कटू सत्य आहे.
पण हिंदवी स्वराज्यात या सर्व गोष्टींना अपवाद म्हटले तरी चालते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे सखे मेहुणे हौसाजी तथा हंबीरराव मोहिते हे एकनिष्ठ, तत्त्वनिष्ठ होते.त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड शहराजवळ असलेल्या तळबीड येथे 1 मे 1630 रोजी झाला. लहानपणापासूनच ते अतिशय कर्तबगार व शूरवीर होते. त्यांच्या अगोदर सरसेनापती नेतोजी पालकर,प्रतापराव गुजर यांनी स्वराज्याचे सरसेनापती पद भूषवले होते.अनेक लढाया त्यांनी जिंकल्या होत्या.गनिमी काव्याचा वापर करून स्वराज्य दिवसेंदिवस वाढविले जात होते. परंतु एके दिवशी प्रतापराव गुजर यांनी बहलोलखानचा पराभव केल्या नंतर त्याला सोडून दिले होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी बहलोल खानास पकडून आणावे. नाहीतर तोंड दाखवू नये.असे स्पष्ट म्हटले.
ही गोष्ट सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या अंत:करणाला लागली. त्यावेळी त्यांनी सात वीरांना एकत्रित करून बहलोल खानास पकडण्यासाठी गेले. त्यात प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल आणि विठोजी शिंदे हे होते.नेसरीच्या खिंडीमध्ये दोन्ही सैन्याची गाठ पडली. धुमश्चक्री सुरू झाली. आणि त्यात प्रतापराव गुजरला 24 फेब्रुवारी 1674 रोजी वीर मरण आले. तेव्हा साहित्यिक वि,वा,शिरवाडकर यांनी त्यांचे वर्णन साहित्यामध्ये अतिशय सुंदर रीतीने केले आहे. ‘वेडात मराठी वीर दौडले सात’त्यानंतर एकनिष्ठ, तत्त्वनिष्ठ इमान इतबारे स्वराज्याची सेवा करणारे सोयराबाई यांचे बंधू हंबीरराव मोहिते यांना सरसेनापती पद किताब प्रदान करण्यात आले. लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक लढाया मध्ये सैनिक म्हणून अतिशय उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केली होती. याची जाणीव महाराजांना होती.तरी त्यांनी त्यांचे कर्तव्य पाहून त्यांना एवढे मोठे पद दिले. तेव्हा नेसरीच्या लढाईत आदिलशाहीच्या सैन्यांना सळो की पळो करून सोडले. स्वतःचे नाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी असून सुद्धा त्यांनी राजशिष्टाचार अतिशय तत्त्वनिष्ठतेने पाळला. नाते कधीही स्वराज्याच्या आडवे येऊ दिले नाही. दुधाचे दूध व पाण्याचे पाणी करणारा एकमेव व्यक्ती म्हणजेच सरसेनापती हंबीरराव मोहिते होय. शत्रूच्या कोणत्याही पद्धतीच्या आमिषाला ते कधी बळी पडले नाहीत. कोणतेच वाईट कृत्ये त्यांच्या हातून घडलेलं नाही.
स्वराज्याच्या कारभारात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ न करता आपल्या पदाशी, व पेशाशी इमान राखणारा महापराक्रमी पुरुष म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते होतं. अष्टप्रधान मधील मुख्य व्यक्ती असणारे सरचिटणीस यांनी रायगडावरील माहिती कोणतीही बाहेर न जाऊ देता छत्रपती संभाजी महाराजांना कसे अडचणीत आणता येईल,
यासाठी जीवाचे रान करून त्यांच्या विरोधात कट कारस्थानं रचली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले तरी त्यांनी पन्हाळगडापर्यंत ही दुःखद बातमी कळू दिले नाही. सत्ता हाती असल्यामुळे त्यांनी कूट कारस्थाने केले. कवी कलशलाही जेरबंद करून टाकले. त्यावेळी अतिशय मुसुद्दीपणाने व चतुराईने सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी कवी कलेशांना अलगद पणे पन्हाळगडावर छत्रपती संभाजी महाराजा समोर उभे केले.
आणि अष्टप्रधान मंडळाला अंधारात ठेवले.अष्टप्रधान मंडळातील अण्णाजी पंत छत्रपती संभाजींना जेरबंद करण्याच्या तयारीत होते.त्यांच्याच बरोबर राहून एकंदरीत सर्व माहिती काढून प्रत्येकाला वाटत होते की, आता छत्रपती संभाजी महाराज पकडले जाणार? कित्येक जनाच्या हृदयाचे ठोके थांबले होते. त्यावेळेसचा प्रसंग पाहण्यासारखा होता. एका बाजूला सखी बहीण सोयराबाई, दुसऱ्या बाजूला सखा भाचा राजाराम महाराज यांचे मंचकारोहण झाले होते. आणि तिसऱ्या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी अष्टप्रधान मंडळातील अण्णाजी पंत टपून बसले होते.यातून अतिशय व्यवस्थितपणे कोणालाही काही कळू न देता हंबीरराव मोहितेंनी आपल्या पदाला शोभेल आणि इतिहासामध्ये अजरामर होईल. अशी भूमिका वठवली. स्वराज्याचे खरे हक्कदार कोण आहेत. हे त्यांना माहीत होते. त्यामुळे पकडण्यास जाते वेळेस सर्वांना वाटत होते की, थोड्याच वेळात छत्रपती संभाजी महाराज पकडले जाणार.. परंतु एकनिष्ठ असणारे महाराणी ताराबाई यांचे वडील व छत्रपती शिवाजी महाराजांचे मेहुणे हंबीरराव मोहिते यांनी डाव फिरवला, व स्वराज्याच्या सरचिटणीस असणाऱ्या अण्णाजी पंत यांना अलगद जेरबंद केले.त्यांच्या खांद्यावर तलवार ठेवली. आणि संपूर्ण पारडे फिरले.छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आग्रा येथे असलेले हिरोजी फर्जंद यांनी ही परिस्थिती पाहून अण्णाजीपंत यांच्या खांद्यावर तलवार टेकवले. त्यावेळी सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसूबाई हंबीरराव मोहिते एक झाले. याचे दुःख अण्णाजी पंत यांना सहन झाले नाही. त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी यांना कठोरा तल्या कठोर शिक्षा केल्या.
त्यांचे कबुली जबाब घेतले. कडेलोट व हत्तीच्या पायी देऊन स्वराज्यामध्ये अडथळे आणणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा दिल्या. त्यामुळेच हे स्वराज्य श्री चे होते.
हे सर्वांनी लक्षात असू द्यावे.
याची आठवण सर्वांना झाली.
असे एकनिष्ठ व्यक्ती होणे सध्याच्या काळात फार अवघड झाले आहे. सरडा जसा रंग बदलतो, तसे आज-काल समाजातील चांगले चांगले व्यक्ती सुद्धा लबाड बोलत आहेत.
याची जाणीव झाली आहे. पण सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ही पराक्रम गाजवला राज्याभिषेकानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीमागे सावलीसारखे ते उभे राहिले. ते स्वामीनिष्ठ व विवेकी होते. विलक्षण व्यक्तिमत्त्वाचे होते. त्यांच्या डोळ्यात फक्त स्वराज्य होते.बुद्धी, शौर्य, शरीर, मन त्यांनी स्वराज्याला अर्पण केले होते. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबरोबर अखेरपर्यंत राहिले मुघल सरदार कुल्लीच खान, रहुल्लाखान, बहादुर खान आणि शहाजादा आझम यांना त्यांनी आपल्या तलवारीचे पाणी पाजले. व त्यांना पिटाळून लावले. आदिलशाही, मुघलशाही, पोर्तुगीज यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. अष्टप्रधान मंडळातील हिंदवी स्वराज्याचे पहिले ते महापराक्रमी सरसेनापती होण्याचा बहुमान त्यांना लाभला. स्वतःचे मन त्यांनी कधीही ढळू दिले नाही. नातेसंबंध असताना सुद्धा चुकीच्या पद्धतीने त्यांनी भाष्य केले नाहीत.म्हणूनच आज ते इतिहासात अजरामर झाले. सर्वांनाच हवेहवेसे व्यक्तिमत्व त्यांनी निर्माण केले. मामा असावा तर हंबीरराव मोहितेसारखा असे समाजात नेहमी उघडपणे बोलले जाते. शकुनी किंवा कंसासारखे मामा आम्हाला नकोत, ज्याने कट कारस्थाने रचल्याने मोठमोठे साम्राज्य लयाला गेले. परंतु एकमेव असा मामा या स्वराज्याच्या कामी आला की, ज्यांनी स्वराज्य आपल्या पराक्रमाने वाढविले व शाबूत ठेवले. अशा या महापराक्रमी सरसेनापतीने वाई येथे मुघल सैन्याचा सरदार सर्जा खानाचा पराभव केला. परंतु तेथेच 16 डिसेंबर 1687 रोजी लढाईत तोफेचा गोळा लागून हंबीरराव मोहिते धारातीर्थी पडले.
त्यांची समाधी तळबीड या ठिकाणी आहे. तेथे गेल्यानंतर एका महापराक्रमी पुरुषांची समाधी कशी असावी.
हे आपल्याला कळून येते. समाधी जवळ शिवकालीन तोफा ठेवलेल्या आहेत. ढाल, तलवारी ऐतिहासिक वेगवेगळे शस्त्र त्या ठिकाणी पहावयास मिळतात. अनेक शिलालेख त्यांचे त्या ठिकाणी आजही वाचन करण्यास मिळतात. बुऱ्हाणपूरची लूट इतिहासात प्रसिद्ध आहे. ती त्यांनी केली होती. हिंदवी स्वराज्यात असे एकनिष्ठ असणारे हंबीरराव मोहिते आजही पावलोपावली लोकांच्या स्मरणामध्ये आहेत. हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे फळ आहे. अशा या महापराक्रमी सरसेनापतीस विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडीच्या वतीने विनम्र अभिवादन.शब्दांकन:
प्रा.विठ्ठल लक्ष्मीबाई गणपतराव बरसमवाड
अध्यक्ष: विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

