जगात अनेक जाती धर्म आहेत.प्रत्येक धर्मात माणसाने मानसाशी माणसासारखे वागावे.असे स्पष्ट सांगितले आहे.ख्रिश्चन धर्मामध्ये येशू ख्रिस्तांना देव मानले जाते.कारण ते ख्रिश्चन धर्माचे संस्थापक आहेत. त्यांनी शत्रूवर सुद्धा प्रेम करावे, त्यांच्याविषयी परमेश्वराकडे शुभ मागणी करावी. त्यांची हीच जाणावे. सूर्य ज्याप्रमाणे सर्वांनाच प्रकाश देतो. तो दुर्जन असो की, सज्जन असो, त्याप्रमाणेच आपण आपल्या शत्रूंवर व मित्रांवर सारखीच प्रीती करावी.असे ते म्हणतात.सर्वां सोबत चांगले
वागावे.हिंसाचार,व्याभिचार,चोरी, एखाद्या गोष्टीबद्दल लालसा करू नये. असे ते म्हणतात. खरोखरच त्यांचे विचार मानवता वादी होते.
येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून इसवी सन सुरू झाले.असे आपण मानतो.येशू ख्रिस्ताने जीवनामध्ये लोकांना महत्त्वाचा उपदेश केला. म्हणून ख्रिश्चन समाज बांधव त्यांना देव मानतात.आज त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण त्यांच्या कार्याची माहिती करून घेत आहोत.येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबर या दिवशी आई मेरीयम (मेरी) वडील जोसेफ यांच्या पोटी झाला.ते ख्रिस्त धर्मोपदेशक होते.त्यांच्या जन्माविषयी विविध मते आहेत. येशूला ख्रिस्तांना लोक ‘मसीहा’ मानत असत.देवाचा पुत्र म्हणून त्यांना मान दिला जातो.पण काही लोकांना ते सहन झाले नाही. म्हणून त्यांना क्रूसावर चढविले.आणि त्यांच्या हाता-पायावर खिळे ठोकण्यात आले.काही शत्रु त्यांच्या विरोधात होते.चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला समाजात नेहमी त्रास दिला जातो. हे यावरून स्पष्ट होते. तरी या मानवतावादी महान व्यक्तीने “हे परमेश्वरा हे काय करत आहेत. त्यांना कळत नाही. त्यांना तू माफ कर” अशा प्रकारचे मुखातून गौरवोद्गार त्यांनी या मानवासाठी काढले. त्यांना अनेक शिष्य लाभले होते.सेंट थॉमस पहिल्या शतकात केरळमध्ये आले होते.अशी नोंद आहे.बायबल हा ख्रिश्चन धर्माचा अतिशय पवित्र धर्म ग्रंथ आहे. त्यातून त्यांनी लोकांना उपदेश केला. देव एकच आहे. तो प्रेमळ पिता आहे. व सर्व शक्तिमान आहे.आपण सर्वजण एकच आहोत. आपण सारे बंधू-भगिनी प्रमाणे वागावे आणि शत्रूवर देखील प्रेम करावे. अशी शिकवण त्याने दिली. येशू हे देवाचे पुत्र मानतात. असे सर्वत्र बोलले जाते. मानव जातीच्या उद्धारासाठी ते पृथ्वीवर आले होते. खरोखरच त्यांनी येथे लोकांना चांगली शिकवण दिली.त्यामुळे लोक त्यांची नेहमी प्रार्थना करतात. आणि त्यांच्या बायबल ग्रंथाचे वाचन करतात. आज जगात ख्रिश्चन धर्म फार मोठ्या प्रमाणात अनेक राष्ट्रांमध्ये उदयाला आलेला आहे.
सर्व ख्रिश्चन बांधव प्रार्थना करण्यासाठी रविवारी एकत्रित येतात आणि येशू ख्रिस्ताची शिकवण तेथील लोकांना करून देतात. त्यांने त्यांच्या जीवनात कधीही कोणाला वाईट बोलले नाही. त्यामुळे त्यांना देवत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे 25 डिसेंबर हा त्यांचा जन्मदिन साजरा केला जातो. प्रत्येक जण इतरांना वेगवेगळ्या भेट वस्तू देऊन तो साजरा केला जातो. केक कापून एकमेकांना तो भरवला जातो. त्यांचा जन्मोत्सव अतिशय आनंदाने सर्वत्र साजरा केला जातो. जवळजवळ सर्वच लोक नवे कपडे घालून हा सण साजरा करतात.छोट्या छोट्या मुलांसाठी मध्यरात्री सांता-क्लाॅज येऊन मुलांना भेटवस्तू ,चॉकलेट देतो असा सामाजिक समज आहे. ख्रिसमस ट्री रंगीबेरंगी सजवली जाते.कारण ते मंगल कल्पनेचे प्रतीक आहे. त्यासाठी ती उभारले जाते.24 डिसेंबरच्या रात्रीपासूनच तयारी सुरू केली जाते.नेहमी त्यांच्या तोंडातील वाक्य “हे परमेश्वरा यांना माफ कर,छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा ते” हे देवा, आम्ही चुकलो असल्यास आम्हाला तुझी माफी असावी” हे वारंवार म्हणतात.आणि आपले चारित्र्य शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात. अशाप्रकारे अतिशय महत्त्वाचा आनंदाचा व हर्षोल्हास साजरा करणारा नाताळ सण दरवर्षी 25 डिसेंबरला संपूर्ण जगात साजरा केला जातो.
असेच एकदा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर मारेकरी धावून आले होते.त्यावेळेस ते म्हणाले “तुम्ही मला मारण्यासाठी आलात ना, मग मारून जा, जास्त वेळ वाट पाहू नका? तुम्हाला जे पैसा मिळणार आहेत.ते तुम्ही घ्यावे.
असे स्पष्टपणे मध्यरात्री मारेकऱ्यांना ते न घाबरता बोलत होते. त्यामुळे मारेकरी गहिवरले आणि त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची माफी मागितली. नंतर ते त्यांचे अंगरक्षक झाले.खरोखर एवढा बदल कसा निर्माण झाला. तर याचे मूळ कारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने क्षमा,याचना, संबंध मानव जातीला शिकवले होते.
चुकतो त्याला क्षमा करावी, म्हणजे त्याच्यात मतपरिवर्तन होते. अशी दूरदृष्टी त्यांची होती. म्हणून तर ते एवढे मोठे झाले.क्षमेमध्ये भरपूर शक्ती असते.क्षमा केल्यानंतर मानवात खरोखर परिवर्तनच व्हावे लागते.परंतु आज,काल क्षमा करून सुद्धा लोक परत सूड घेण्यासाठी अंगावर चालून येत आहेत. हे मात्र दुर्दैव म्हणावे लागेल, ही समाजाची परिस्थिती वेगळी झाली आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधीजी एका गालावर मारल्यास दुसरे गाल पुढे करावे.
असे सांगत होते.आज लोक दोन्ही गालावर मारून परत कुठे मारू? असा प्रश्न विचारतील? एवढा काळ बदललेला आहे.तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांना सुद्धा दूष्ट अविचारी लोकांनी गोळ्या घालून मारले. ही शोकांतिका आहे. जो व्यक्ती आपल्या समाजासाठी अहोरात्र परिश्रम करतो आणि आपल्याला सत्याच्या बाजूने नेतो.आपल्यात असलेले दुर्गुण अशिक्षित पणा,निरक्षरपणा काढून टाकून वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो. त्यांना सुद्धा या अविवेकी लोकांनी ठार मारले. आजही त्यांचे मारेकरी मोकाट फिरत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी 1915 ते 1948 पर्यंत भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी आणि इंग्रजांना हाकलून देण्यासाठी सतत 35 वर्ष अनेक वेळा उपोषण केले.अनेक चळवळी मधून त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते.दक्षिण आफ्रिका,इंग्लंड या ठिकाणी फिरवून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले.परंतु त्यांच्या वर सुद्धा नथुराम गोडसे यांनी गोळ्या झाडल्या.ही घटना मनाला दुःख देणारी आहे.समाजासाठी कार्य करणाऱ्या महान व्यक्तीला समजून घ्यावे लागते.तेव्हाच त्यांच्या शब्दांला धार येते.संत ज्ञानेश्वर महाराजांना संन्याशाची पोरे म्हणून हिणविले गेले.त्यांचा छळ करण्यात आला.दारोदारी मधुकरी मागून घेते वेळेस सुद्धा त्रास देण्यात आला. तरीही त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये एकही वाक्य समाजाने मला त्रास दिला.असे लिहिले नाही.क्षमा करून” जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्पर पडो.मैत्र जिवाचे|| असे म्हणून मनाचा मोठेपणा दाखवून दिला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी अंगावर माती,दगड,शेण झेलले परंतु त्यांनी कोणालाही ब्र शब्द बोलला नाही.आपले प्रबोधनात्मक शैक्षणिक, सामाजिक कार्य अहोरात्र चालू ठेवले. म्हणूनच ते आज क्रांतीज्योती पदाला पोहोचले. पुणे विद्यापीठाला महाराष्ट्र सरकारने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे त्यांचें नाव दिले आहे. हे फक्त क्षमेतून बाहेर येते. क्षमा करण्यात फार मोठी ताकद आहे. म्हणूनच येशू ख्रिस्ताने वरील वाक्य आपल्या मुखातून काढून सबंध जगाला शांततेचा पवित्र संदेश दिला आहे. म्हणूनच आज जगभरात त्यांना त्यांच्या जन्मोत्सवाच्या दिनी मानाचा मुजरा केला जातो. हे त्रिकाल सत्य आहे.जगद्गुरु तुकाराम महाराजांना ही देहू मध्ये भरपूर त्रास झाला. त्यांच्या अंगावर मारेकरी पाठवले. एक महिला पाठवून त्यांचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु त्यांनी सर्वांनाच क्षमा केली. त्यांच्या विरोधात ते कुठेच गेली नाहीत.आपले कार्य चालू ठेवले. त्यामुळे लोक त्यांना शरण आले. तरी त्यांनी काहीही बोलले नाहीत. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगावर त्या व्यक्तीने 108 वेळा पान खाऊन थुंकले. तरीही महाराजांनी फार मोठ्या मनाने त्याला क्षमा केली.माणसाला या जगात मोठं होण्यासाठी शांतिदूत बनावं लागते.भारताचे पहिले बौद्ध धर्मीय 52 वे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर ज्येष्ठ वकील राकेश किशोर यांनी सहा ऑक्टोबर 2025 रोजी बूट फेकून मारले. तरीही त्यांनी कुठेच त्याची तक्रार केली नाही. उदार मनाने त्यांना क्षमा केली.थोड्या दिवसानी ते सेवानिवृत्त झाले. हे वरील अनेक उदाहरणा वरून आपणास सांगता येईल की ,खरोखरच प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणी मधूनच हे सर्व प्रेरणा घेऊन लोकांना क्षमा केल्या आहेत.त्यामुळेच प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिन सर्वत्र साजरा जातो.हीच त्यांच्या क्षमेमध्ये असलेली शक्ती आहे. हे नाकारून चालणार नाही.नाताळ सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.प्रा. विठ्ठल लक्ष्मीबाई गणपतराव बरसमवाड
अध्यक्ष : विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

