मुखेड: (दादाराव आगलावे)
येथून जवळच असलेल्या दापका (राजा) येथील दिलीप दिवाकर केंद्रे हा वडीलाचे स्वप्न उराशी बाळगून मुंबई येथे फौजदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली असून वडीलाचे छत्रछाया हरवलेल्या दिलीपने आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे.दापका (राजा) येथील रहिवाशी व श्री संत नामदेव महाराज विद्यालय येथील विद्यार्थी दिलीप दिवाकर केंद्रे यांच्या वडीलाची इच्छा तू फौजदार बनाव ही होती.
दहावी वर्षात असतानाच दिलीपचे वडील दिवाकर केंद्रे यांचे अकाली निधन झाले व दिलीप हा वडीलाच्या प्रेमापासून पोरका झाला. वडिलांना दिलीप हा फौजदार व्हावं ही अतिव इच्छा. दिलीपची आई श्रीमती कांताबाई व सुधाकर, मधुकर व भारत हे त्यांचे चुलते. दिलीपला वडीलाची त्यांनी अजिबात आठवण होऊ दिली नाही व अभ्यासास लागणारे सर्व साहित्य त्यांनी पुरविले. जमीन केवळ दोन ते तीन एकर. या शेतीमध्ये काय उत्पन्न होते? वडिलांनी तर आपणास फौजदार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली त्यांचा ध्यास घेऊन दिलीपने अहोरात्र अभ्यास केला व त्यांची फौजदार म्हणून निवड झाली व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. त्यांची ट्रेनिंग पूर्ण होऊन त्यांना मुंबई हेडक्वार्टर येथे फौजदारपदी नेमणूक मिळालेली आहे.

-दिलीप केंद्रे यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी डावकरे, वसंत चव्हाण, बुद्धाजी किनवाड, दादाराव आगलावे, सतीश मस्कले, सचिन बादेवाड, चंद्रकांत तेलंगे, प्रदीप दापकेकर, सुलिंदर गायकवाड, रवींद्र हादवे, अशोक धुळशेट्टे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कु.ऋतुजा केंद्रे यांनी औक्षण केले. दिलीप केंद्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

