अतिशय धडपड करणारे,शिक्षणात महत्वाचा योगदान असलेले व ग्रामीण भागातुन शिक्षणात नेतृत्व करून,
अतिशय चांगली शाळा निर्माण करण्याचे काम बिरादार दाम्पत्याने केले असल्याचे प्रतिपादन आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शिक्षण तपस्वी संभाजी बिरादार यांच्या ग्रंथ सोहळा व कृतज्ञता सोहळा प्रसंगी प्रसंगी केले.छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था संचलित, कुसुमताई प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोदावरी पब्लीक स्कुल, सिडको, नांदेड येथे 3 जानेवारी ‘सावित्रीबाई जयंती’ व 12 जानेवारी ‘माँ जिजाऊ जयंती’ व 6जानेवारी ‘सुभद्रा आई’ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शेख निजाम गवंडगावकर लिखीत शिक्षण तपस्वी संभाजी बिरादार ग्रंथ प्रकाशन व कृतज्ञता सोहळा 3 जानेवारी सकाळी 10 वा. स्थळ :कुसुमताई हायस्कुल सिडको, नविन नांदेड आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी आ.प्रतापराव पाटील चिखलीकर,तर प्रमुख पाहुणे म्हणून जगदीश भंडरवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एटीएस नांदेड) विनायक जाधव (प्राचार्य,शिवाजी महाविद्यालय उदगीर) तर प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी इबितदार मसाप जिल्हाध्यक्ष शाखा नांदेड,सु.ग.जाधव यांच्यी तर ग्रंथ प्रकाशन-हस्ते-भाष्य
सौ. शशिकलाताई व संभाजीराव बिरादार (सचिव, श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था) यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माधव सलगर, शिक्षणाधिकारी, जि.प. नांदेड) प्रमुख पाहुणे म्हणून रामभाऊ तरटे, श्रीनिवास मस्के ( साहित्यिक, नांदेड)रामचंद्र पाचंगे (उप-शिक्षणाधिकारी, जि.प. नांदेड) राहुल अत्राम (कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी कें. नदिड, व्यंकट पाटील ,आलेवाड दत्तात्रय , डी.बी. जांभरूनकर,गोविंदराव मेथे सय्यद मजहर हुसैन, बुरसपट्टे बालासाहेब, एस. डब्ल्यू कुलकर्णी यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे सन्मान चिन्ह शाल श्रीफळ व ग्रंथ देऊन ग्रंथ सन्मान करण्यात आला,तर कुसूमताई प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व गोदावरी पब्लिक स्कूल यांच्या वतीने संभाजी बिरादार व सौ.शशीकलाताई बिरादार यांच्या सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर साहित्यीक प्रकाशक शेख निजाम गंवडगावकर यांच्या ही यथोचित सन्मान करण्यात आला,या वेळी संभाजी बिरादार यांच्यी ग्रंथ तुला करण्यात आली.प्रकाशन व कृतज्ञता सोहळा समितीचे दिलीप बनसोडे ,उमाकांत बिरादार व्यंकट पाटील , अवतारसिंग सोढी (समाजसेवक,) सय्यद शोएब हसैन (नगरसेवक, म.न.पा. नांदेड) मेहरवबान जाधव,किशोर इप्पर, सुर्यकांत वडजे,संजय सुर्यवंशी, सतिश जाधव,अभिजीत खेडकर, प्रा.अंगद केंद्रे,प्रा.भागवत हरे,अशोक गायकवाड, दिगंबर शिंदे,प्रा.मधुकर गायकवाड, अभिजीत बिरादार, सौ.सुजाता जाधव-बिरादार, सत्यजीत बिरादार यांच्या समावेश होता.तर सुत्रसंचलन विश्वास हंबर्डे सौ.वंदना सोनाळे यांनी केले.
सोहळा यशस्वीतेसाठी कुसुमताई प्रा,मा.व उच्च मा.विद्यालय,सिडको यशवंतराव चव्हाण प्राथमिक विद्यालय ,वसरणी शांतीनिकेतन पब्लीक स्कुल,मालेगाव गोदावरी पब्लीक स्कुल, सिडको येथील मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

