नांदेड :
आज शैक्षणिक निसर्ग सहल उपक्रमांतर्गत
जि प प्रा शा कारेगाव येथील निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले होते..मोहन अण्णा हंबर्डे त्यांच्या फार्मसी कॉलेजला विज्ञान साहित्य निसर्ग रम्य परिसराला भेट देण्यात आली .यावेळी विद्यार्थ्यांनी निसर्ग सहल मध्ये नैसर्गिक वनस्पती चे निरीक्षण यामध्ये वनस्पती ओळखणे, वनस्पतींच्या पानाचे आकार, खोड निरीक्षण, झुडप, वृक्ष संकल्पना बोर वनस्पती चे निरीक्षण करणे, इत्यादी माहिती विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन माहिती घेतले,
यावेळी फार्मसी कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मानवी शरीर चे प्रतिकृती, विज्ञान चार्ट, वर्कशॉपमध्ये डिझेल इंजिन, विद्युत मोटार, वेगवेगळे टुल्स ची माहिती घेतली, यानंतर
वन भोजन चा स्वाद विद्यार्थ्यांनी घेतला, व्हाॅलीबाॅल खेळ खेळले, यामध्ये मुले खूप मुले खेळण्यात तल्लीन झाले होते, आज मुलांच्या चेह-यावर हास्य स्पष्ट दिसत होते, तर काही मुले अभ्यासात जरी कमी असतील पण या सहलीत मदत करणे दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने करणे, सर्व साहित्य आहे का? काळजी घेणे, एक विद्यार्थी यामधील सुप्त गुण दिसून आले, जबाबदारी कशी चांगली पार पाडावी हे सिद्ध करुन दाखवले आहे,तर काही विद्यार्थी यांची चिकित्सक वृत्ती पण दिसून आली, प्रश्न विचारणे, मनमोकळेपणाने संवाद, गप्पा आज विद्यार्थ्यांनी साधला आहे, सुप्त गुणांना वाव देणारी सहल ही विद्यार्थीना प्रेरणादायी ठरली आहे.मुख्याध्यापिका भोसले मॅडम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील मोरे श्रीमान अंबुलगेकर संतोष सर , संजय वाघमारे सर, शुभांगी जाधव मॅडम, बेबी ढवळे मॅडम, शापोआ च्या कर्मचारी यांनी सहकार्य केले. अशा रीतीने निसर्ग सहल अतिशय आनंदात पार पडली .

