राजमाता जिजाऊचे मराठ्यांच्या इतिहासातील स्थान अत्यंत मोलाचे आहे.कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवून स्वराज्याचा पाया भक्कम उभारला.त्या केवळ माता नव्हत्या तर स्वराज्य निर्मितीच्या प्रेरिका रणरागिणी होत्या.त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही रयतेच्या कल्याणा साठी, सोयीसाठी,न्याय व हक्कासाठी लढल्या.आणि त्यातूनच एक महान राष्ट्र घडले. म्हणून तर त्या राष्ट्रमाता म्हणून सर्वांना आदरणीय पूजनीय आहेत. विखुरलेल्या देश बांधवांना,सवंगड्यांना,एकतेच्या सूत्रात गुंफून स्वराज्य उभे करणे. एवढे सोपे काम नव्हते. रयत भाई भी झाली होती.सर्वत्र अंदाधुंदी माजली होती. रयतेतील महिलांना त्रास दिला जात होता.कोणीही या काळात सुरक्षित राहिले नव्हते.अशा काळी मराठी मातीत ज्याने, केला गनिमी कावा,
तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा. म्हणून तर तिने सांभाळले सर्वांना,प्रेमाने स्वराज्य उभे राहिले. तुळजापूरच्या भवानी मातेच्या आशीर्वादाने जिजाऊ माँ साहेबाचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य,शौर्य,प्रचंड आत्मविश्वास,इच्छाशक्ती आणि गरिबाप्रति प्रचंड तळमळीने त्यांचं मन ओतप्रोत भरलेलं होतं.
शिवाजी महाराजांचे यश हे जिजाऊच्या कार्याचे फलित आहे.
‘ना वाकायचे,ना झुकायचे,अन्याय विरुद्ध लढाई करायचे… अशी त्यांची प्रेरणादायी शिकवण होती. म्हणूनच जिजाऊ माँ साहेब मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झालेल्या आहेत.त्या सूर्य,चंद्र असे पर्यंत त्यांच नाव दाही दिशेला झळकत राहील.आजची आई आपल्या स्वतःच्या मुलांना कोणाच्याही भानगडीत पडू नकोस, आपल्याला काय करायचे?ते आपले जवळचे नाहीत.असे म्हणून त्या घटनेपासून बाजूला करते.
आजची आई आत्मकेंद्रित होत आहे. त्या काळात मात्र जिजाऊने उपेक्षित, वंचित,शोषित,पीडित जनतेला पहिले प्राधान्य दिले,त्यांच्या संरक्षणाचा विचार केला.आज देखील लोक शिवाजी महाराज जन्मावा, परंतु इतरांच्या घरात आपल्या येथे नको. असे म्हटले जाते. राष्ट्रमाता जिजाऊच्या विचारांची आणि संस्काराची ताकद आजही महाराष्ट्राच्या संस्कृतीत पावलोपावली दिसून येते.त्यांचे कार्य महिलांना स्वतःच्या अधिकारासाठी लढण्याची प्रेरणा देतात. त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य हे फक्त एक राजकीय स्वराज्य नव्हते,तर त्यात सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक स्वातंत्र्य होते. राजमाता जिजाऊ यांचे जीवन हे धैर्य,कर्तव्यनिष्ठा आणि मातृत्व यांचे अद्वितीय उदाहरण आहे. त्या केवळ शिवाजी महाराजांच्या माताच नव्हत्या, तर त्या संपूर्ण हिंदवी स्वराज्याच्या आधारस्तंभ होत्या. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आग्रा भेटीस गेले. त्यावेळी संपूर्ण रयतेची जबाबदारी जिजाऊ मातेने आपल्या खांद्यावर घेतली होती.काही दिवसानंतर छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून सही सलामत रायगडावर आले.आणि सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यांच्या राज्यभिषेकांच्या वेळी राष्ट्रमाता जिजाऊ हजर होत्या.मुलांचे हे कौतुक पाहून डोळ्यातून आनंदाश्रू आले. ज्यावेळेस हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजी भोसले मरण पावले. त्यावेळेस जिजाऊ या सती जाण्यासाठी निघाल्या होत्या.
परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या विचारात परिवर्तन केले. व सती जाऊ दिले नाही. महाराजांनी आईची मनोभावे सेवा केली.राज्याभिषेक सोहळ्यानंतर काही दिवसांनी रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड गावात जिजाऊचे निधन झाले. तिथेच त्यांनी मातेचे स्मारक उभारले. परकीयांच्या गुलामीतून आपल्या राष्ट्राला सही सलामत स्वतंत्र करणाऱ्या शिवबा सारख्या महापराक्रमी राजांस जन्म दिला आणि शूरवीर असणाऱ्या छत्रपती संभाजी राजाचे पालन पोषण केले.
अशा या महान पराक्रमी,रयतेच्या पाठीमागे सदैव राहणाऱ्या राष्ट्रमातेस त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना मानाचा मुजरा..
प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत
अध्यक्ष :विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

