नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू.
नांदेड_दि. 24 |
गुरुवार 24 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 267 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 236 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 76 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 160 बाधित आले.
आजच्या एकुण 1 हजार 141 अहवालापैकी 875 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 14 हजार 436 एवढी झाली असून यातील 10 हजार 450 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 537 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 53 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
या अहवालात एकुण 7 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बुधवार 23 सप्टेंबर रोजी कौडगांव ता. लोहा 75 वय वर्षाचा एक पुरुष , एकता नगर नांदेड 70 वय वर्षाचा एक पुरुष, मुक्रमाबाद ता. मुखेड येथील 24 वय वर्षाचा एक पुरुष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथे तर धर्माबाद तालुक्यातील 61 वय वर्षाचा एक पुरुष, बसवेश्वर नगर नांदेड येथील 52 वय वर्षाचा एक पुरुष जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड, मानस नगर नांदेड येथील 70 वय वर्षाची एक महिला खाजगी रुग्णालयात तर गुरुवार 24 सप्टेंबर 2020 रोजी किनवट तालुक्यातील धानोरा येथील 60 वय वर्षाच्या एका महिलेचा किनवट कोविड केअर सेंटर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 378 झाली आहे.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड 17, बिलोली कोविड केअर सेंटर 2,धर्माबाद कोविड केअर सेंटर 6, मुखेड कोविड केअर सेंटर 19, माहूर कोविड केअर सेंटर 13, खाजगी रुग्णालय 5, उमरी कोविड केअर सेंटर 1, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 12, किनवट कोविड केअर सेंटर 7, लोहा कोविड केअर सेंटर 7, नायगाव कोविड केअर सेंटर 15, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन / होमआयसोलेशन 159, हदगाव कोविड केअर सेंटर 11 असे 267 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 51, कंधार तालुक्यात 2, अर्धापूर तालुक्यात 4, भोकर तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 2 , परभणी 1, नांदेड ग्रामीण 4, मुखेड तालुक्यात 4, नायगाव तालुक्यात 3, लोहा तालुक्यात 2, हिंगोली 1, बीड 1 असे एकुण 76 बाधित आढळले.
तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 81, हदगाव तालुक्यात 2, धर्माबाद तालुक्यात 11, किनवट तालुक्यात 4, बिलोली तालुक्यात 2, हिमायतनगर तालुक्यात 3, भोकर तालुक्यात 4, देगलूर तालुक्यात 3, अर्धापूर तालुक्यात 2, नांदेड ग्रामीण 4, मुदखेड तालुक्यात 10, लोहा तालुक्यात 5, मुखेड तालुक्यात 18, नायगाव तालुक्यात 5 , कंधार तालुक्यात 2 , उमरी तालुक्यात 2, माहूर तालुक्यात 1, परभणी 1 एकुण 160 बाधित आढळले
जिल्ह्यात 3 हजार 537 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 271, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित 1 हजार 763, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 81, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 47, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 114, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 52, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 142, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 75, लोहा कोविड केअर सेंटर येथे 30, हदगाव कोविड केअर सेंटर 40, भोकर कोविड केअर सेंटर 49, कंधार कोविड केअर सेंटर येथे 33, बारड कोविड केअर सेंटर 17, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 36, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 110, मुदखेड कोविड केअर सेटर 54, माहूर कोविड केअर सेंटर येथे 23, किनवट कोविड केअर सेंटर येथे 130, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 55, उमरी कोविड केअर सेंटर 55, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 25, खाजगी रुग्णालयात 329 बाधित, हैद्राबाद येथे संदर्भित 2, औरंगाबाद येथे संदर्भित 2, निजामाबाद येथे संदर्भित 1, अकोला येथे संदर्भित 1 झाले आहेत.