कंधार( दिगांबर वाघमारे )
कंधार तालुक्यात ७८ वर्षापूर्वी तीर्थक्षेत्र गऊळ नगरी स्थापन झालेल्या श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार संस्थेतील मातृशाखा श्री.शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उर्दू ,मराठी कंधारची सहल दिनांक १० जानेवारी ते १४ जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये कोकण दर्शन त्यामध्ये कोल्हापूर मधील कनेरी मठ, महालक्ष्मी मंदिर ,छत्रपती शाहू पॅलेस ,पन्हाळा किल्ला ,आंबा घाट तसेच रत्नागिरी मधील नाणीज मठ ,गणपतीपुळे मधील गणेश मंदिर ,व समुद्रकिनारा, कोयना धरण ,पंढरपूर मधील विठ्ठल मंदिर या स्थळांना भेटी देऊन दिनांक 14 जानेवारीला कंधारला सुखरूप पोहोचली.
या सहलीसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रा पुरुषोत्तम धोंडगे साहेब,सचिव गुरुनाथ राव कुरुडे साहेब , सहसचिव अँड मुक्तेश्वर धोंडगे साहेब, शालेय समिती अध्यक्षा प्रा. लीलाताई आंबटवाड मॅडम यांनी मार्गदर्शन केले त्यामुळे ही सहल यशस्वी होऊ शकली. बस आगार प्रमुखांनी व तेथील अधिकारी श्री जोगे साहेबांनी कमी वेळेमध्ये तीन बस उपलब्ध करून दिल्या. सहलीची सुरुवात क्रांती भवन बहाद्दरपुरा . कंधार नगरीत ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व आमदार संस्थापक व संचालक डॉ. भाई केशवराव धोंडगे यांची क्रांतीज्योत ज्ञानसागर शक्तिपीठ या चीरसमाधी प्रेरणास्थळाचे दर्शन घेऊन करण्यात आली. या संस्थेचे सहसचिव अँड मुक्तेश्वर भाऊ धोंडगे यांनी सर्व सहलीत सहभागी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर बंधू भगिनींच्या मनगटावर डॉ. भाई मुक्ताई सुताच्या शैली प्रमाणे अत्तरगंध लावून मानाची जय क्रांती करत सदिच्छा दिल्या.
यावेळी मुख्याध्यापक श्री मुरलीधर घोरबांड सर , मुख्य लिपिक पंडित लाडेकर ,रमेश चोकले ,कानिंदे मॅडम , तमखाने मॅडम ,देशपांडे मॅडम,आयनोदिन, कुरे सर ,अण्णकाडे सर ,आर्य सर ,कदम सर ,सूर्यवंशी सर ,गजानन घोरबांड ,सचिन जाधव सर, केदार पटणे ,मन्मथ पेठकर ,उल्हास राठोड ,सारिका जायभाये या सर्वांनी जबाबदारी घेऊन सहल यशस्वी केली.
सहली दरम्यान श्रीक्षेत्र नृसिंहवाडी तसेच नाणीज मठ व चिपळूण येथे राहण्याची व भोजनाची अतिशय उत्तम व्यवस्था केली होती. सर्व पालक व विद्यार्थी यांनी सहकार्य केले तसेच बस चालक राठोड मधुकर कंठीराम ,भरत नामदेव जाधव , व एस बी मोरे यांनी उत्तम ड्रायव्हिंग करून करून प्रवास सुखकर केला. या सहलीत ११८ विद्यार्थी व १८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

