कंधार : प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिना निमित्य आयोजित विविध कार्यक्रमात सर्वंच विद्यार्थानी सहभाग घ्यावे. आनंदनगरी सारख्या कार्यक्रमातून विद्यार्थाना व्यवहार ज्ञानाचे धडे मिळतात ते आयुष्यभर प्रत्यक्ष सोबत येते असे प्रतिपादन संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे सचिव चेतन भाऊ केंद्रे यांनी कंधार येथे केले.
संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले प्राथमिक शाळा कंधार येथे आनंदनगरी कार्यक्रम दिनांक 19 जानेवारी रोजी संपन्न झाला.या आनंदनगरीचे उद्घाटन संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे सचिव चेतन भाऊ केंद्रे ,यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी सखोल व प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जे जी केंद्रे,खाजगी शिक्षक महासंघाचे कंधार तालुका अध्यक्ष भास्कर पाटील कळकेकर, शिक्षक नेते राजहंस शहापुरे,पत्रकार मोहम्मद अन्सारोदिन,सुभाष मुंडे पालक अमित मोरे,विलास वाघमारे आदीची उपस्थिती होती.महात्मा फुले शाळेचे मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे यांनी सत्कार समारंभानंतर कार्यक्रमाची प्रास्तावणा केली त्यातून शाळेतील विविध प्रेरणादायी गुणवत्ता पूर्ण उपक्रमाची त्यांनी माहिती दिली. या आनंदनगरी उपक्रमात 40 स्टॉल लावण्यात आली होती. मिसळ, वडापाव,मुरमुरे, गुलाब जामून, मठ्ठा, चिक्की, चहा, कॉफी, दशमी आदीसह विविध पदार्थावर खरेदीदार पालक, विद्यार्थी यांनी ताव मारला.यातून जवळपास सतरा हजार रुपयांची उलाढल झाली.शिक्षिका उषा कागणे, आनंद आगलावे,राजू केंद्रे,माणिक बोरकर,मेघा जाधव यांची उपस्थिती होती.

