#नांदेड , दि. २१ जानेवारी :- “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम दि. २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी नांदेड येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असल्याने, त्यांच्या सोयी-सुविधांच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांची पाहणी आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मैदानाची सज्जता, प्रवेश व निर्गमन मार्ग, वाहनतळ व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, सुरक्षा व आपत्कालीन व्यवस्थापन,लंगर व्यवस्था, मुख्य मंडप आदी बाबींच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व काटेकोरपणे काम वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व यंत्रणा सज्ज असून, कार्यक्रमपूर्व तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
०००००
#हिंददीचादर
#गुरुतेगबहादूर
#शहीदीसमागम
#350thShaheedi
#GuruTeghBahadurJi
#hinddichadar
#shahidisamagam
#guruteghbahadursahibji
#नांदेड
Atul Save Madhuri Misal
Maharashtra DGIPR विभागीय माहिती कार्यालय, लातूर DDSahyadri Doordarshan National (DD1) आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर All India Radio News Hind Di Chadar

