एकल पालकांच्या मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप.

अहमदपूर ;प्रा.भगवान आमलापुरे


येथील नांदेड रोडवरील ग्रामीण विकास लोक संस्थेच्या वतीने एका छोटेखानी कार्यक्रमात ,तालुक्यातील अर्थीक दुर्बल घटकातील एकल पालकांच्या मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष मच्छिंद्र गोजमे,सुनील खंडाळीकर,गंगथडे सर, पोद्दार मामा, प्रा.भगवान आमलापुरे यांची उपस्थिती होती.     

   यावेळी संस्थाध्यक्ष मच्छिंद्र गोजमे यांनी या शैक्षणिक साहित्याचा खर्च जमा करण्यासाठी मी कुणाकुणाशी कसाकसा संवाद साधला हे सांगितले. जर १०० जणांशी संवाद साधला तर त्यातील ०४-०५ जण हो भरतात. तर त्यातील ०१- ०२ एक – दोघच प्रत्यक्षात मदत करतात.त्यामुळे,या शैक्षणिक साहित्याचा सदुपयोग व्हावा.

वहीतील एकही पान वाया घालवू नका. असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुनील खंडाळीकर, प्रा.भगवान आमलापुरे यांनीही थोडक्यात मनोगत व्यक्त केले. एस.ए.खंदारे,प्रा.गणेश मदने आणि जेष्ठ साहित्यीक एन.डी.राठोड यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *