उदगीर ;
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रतिष्ठेचा असणारा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार उदगीर येथील मूळ रहिवासी असलेले डॉ.अमोल रवींद्र कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे . त्यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने उदगीरच्या वैभवात भर पडली आहे.पाच लाख रुपये , प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणारे मराठवाड्यातील ते पहिले मानकरी ठरले आहेत.
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात 1958 पासून डॉ .भटनागर पुरस्कार संशोधनासाठी दिला जातो . यावर्षीच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये उदगीर येथील डॉ. अमोल कुलकर्णी यांचा समावेश आहे .अमोल कुलकर्णी यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण उदगीर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालय झाले आहे . मुंबई त्यांनी केमिकल इंजिनियरची पदवी प्रदान केली . या क्षेत्रातील पदवीनंतर त्यांनी याच विषयात डॉक्टरेट मिळवली . जर्मनीत जाऊन पोस्ट डॉक्टरेट मिळविली त्यानंतर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी येथे कार्यरत असणाऱ्या कुलकर्णी यांच्या नावावर पेटंट आहेत . महाविद्यालयीन काळात समर रिसर्च प्रोजेक्टच्या माध्यमातून संशोधन क्षेत्रात वळल्याचे डॉक्टर कुलकर्णी यांनी सांगितले . जे .बी .जोशी , ,अनिरुद्ध पंडित , विवेक रानडे डॉ. वरही. डी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही वाटचाल झाल्याचे ते म्हणाले .दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या अमोल कुलकर्णी यांनी शैक्षणिक यशाची कमान या माध्यमातून कायम ठेवली आहे . त्यांचे वडील अरविंद कुलकर्णी व आई अनघा कुलकर्णी हे लालबहादूर शास्त्री विद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत .
या यशाबद्दल राज्यमंत्री संजय बनसोडे , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे , नगराध्यक्ष बसवराज बागबंदे , माजी आमदार सुधाकर भालेराव ,उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी त्यांचे कौतुक केले आहे .