पुलगावात ‘धम्मसंवाद’चे तिसरे पुष्प संपन्न
पुलगाव : (करन सातपुते)
प्रत्येक रविवारी आंबेडकरी अनुयायांनी विहारात गेलेच पाहिजे या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाचे पालन करत समता सैनिक दल पुलगांव शाखेने धम्मसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक रविवारी परिसरातील विविध ठिकाणच्या बौद्ध विहाराला भेट देऊन तिथल्या लोकांशी धम्मचळवळ विषयक चर्चा केली जाते. आजच्या परिस्थितीत कोविड-१९ प्रभावामुळे आठवड्याऐवजी या पंधरवाड्यात धम्मसंवाद या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. याच अनुषंगाने धम्मसंवादचे तीसरे पुष्प राजेंद्र गणवीर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले होते.
तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला पुष्प वाहून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सोनुले यांनी स्वीकारले तर धर्मेंद्र अंबादे यांनी `नवीन शैक्षणिक धोरण व आंबेडकरी समाजाचे दायित्व ´ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्क्रमाचे सूत्रसंचालन नेहमी प्रमाणे गौतम शिंपी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार मधुरंध नांदेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला समता सैनिक दलाचे सर्व कार्यकर्ते आणि परिसरातील उपासिका यांची उपस्थिती होतीAttachments area