खासदार चिखलीकर यांच्या वाढदिवसानिम्मित श्री अखंडपाठ संपन्न

खासदार चिखलीकर यांच्या वाढदिवसानिम्मित श्री अखंडपाठ संपन्न

  नांदेड ; नागोराव कुडके

नांदेडचे लोकप्रिय खासदार श्री प्रतापरावजी पाटिल चिखलीकर यांच्या वाढदिवसानिम्मित गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजूरसाहेब येथे आयोजित श्री अखंडपाठ साहेबची समाप्ति रविवार दि. 2 रोजी पार पडली. पाठ समाप्ति वेळी उच्चारित अरदास मध्ये खासदार श्री प्रतापराव पाटिल यांच्या सुदृढ़ स्वास्थ्य, राजकीय  क्षेत्रात समृद्धि व सेवा कार्यांसाठी ऊर्जा लाभों अशी प्रार्थना वाहेगुरु पुढे करण्यात आली. गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य आणि खासदार चिखलीकर यांचे खंदे समर्थक स. जगबीरसिंघ शाहू यांच्या तर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील दि. 2 ऑगस्ट रोजी गुरुद्वारात श्री अखंडपाठचे आयोजन करण्यात आले होते. या पाठाचे समापन रविवारी सकाळी 9 वाजता दरम्यान करण्यात आले. या वेळी जगबीरसिंघ शाहू हे स्वतः उपस्थित होते. त्यांच्या सोबत स. महेंद्रसिंघ नालेवाले, स. दिलीपसिंघ भोसीवाले, स. मनदीपसिंघ शाहू, स. सुरेंद्रसिंघ सोखी, श्री चांदोजी पाटिल मेंढलकर आणिइतर उपस्थित होते. सध्या कोरोना लॉकडाउनची परिस्थिती असल्यामुळे इतर कार्यक्रम टाळल्याचे स. जगबीरसिंघ म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *