घागरदरा येथे अण्णाभाऊ साठे स्मारकाचे भुमिपुजन

कंधार :हनमंत मुसळे

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्ष महोत्सवानिमित्त तालुक्यातील मौजे घागरदरा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने दि.५ रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित स्मारकाचे भुमिपुजन संत एकनाथ महाराज यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.

साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे स्मारक उभारण्याचा घेतलेला निर्णय उल्लेखनिय असून साधू-संतानी दिलेल्या शिकवणीचा वसा अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकातून साधणार असण्याचे सुरेश चिंतेवार यांनी सांगितले.
सुरेश चिंतेवार व लालबा शिंदे यांनी आर्थिक मदत जाहीर केली तर सरपंच संभाजी गडंबे यांनी संत एकनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने व सर्व गावकऱ्यांच्या मदतीने लवकरच पुर्णत्वाकडे जाईल असे सांगितले.

यावेळी सरपंच संभाजी गडंबे,लालबा शिंदे, पत्रकार मुकुंद शिंदे,सुरेश चिंतेवार,माधव घुगे,संग्राम नांदेड,व्यंकटी घुगे,नारायण कागणे,नागनाथ गुट्टे,त्र्यंबक कागणे,राजु घुगे,वामण गडंबे,धनाजी गडंबे, निवृत्ती गडंबे,राजु वाघमारे,चांदु गडंबे,संजय गुट्टे,शंकर गडंबे,माणिका कांबळे,दत्ता गडंबे, दिगांबर वाघमारे ,प्रा.सुभाषराव वाघमारे प्रा.भागवत गोरे ,यांसह समस्त गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *