कंधार ; दिगांबर वाघमारे
महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ
मराठवाडा प्रांत कार्याध्यक्ष म्हणून महंत श्री एकनाथ नामदेव महाराज उब्रजकर व सल्लागार महंत श्री नराशाम महाराज येवतीकर यांची निवड मराठवाडा प्रदेश अध्यक्ष महंत श्री महादेव महाराज बोराडे शास्त्री यांनी सर्वानुमते केली आहे.
कुशल संघटक, चारित्र्य संपन्न व्यक्तित्व, प्रभावी वक्तृत्व, उत्तुंग कर्तृत्व ,वारकरी विचारांना समर्पित जीवन असणाऱ्या गुरुवर्य महंत श्री एकनाथ नामदेव महाराज उम्रजकर व सल्लागार महंत श्री नराशाम महाराज येवतीकर महाराजांच्या या सार्थ निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन….
वारकरी महामंडळ ही संघटना वारकऱ्यांचे संघटन व एकीची वज्रमूठ निर्माण व्हावी यासाठी संतवीर वै. रामदासबुवा मनसुख यांनी स्थापन केलेली महाराष्ट्रातील सर्वात पहिली वारकरी संघटना आहे. महामंडळाची 1987 मान्यता शासनाद्वारे प्राप्त असणारे एकमेव संघटन होय.
ज्या संघटनेच्या द्वारे पंढरपुरातील पांडुरंग मंदिर सर्वांसाठी खुले झाले, ज्या संघटनेद्वारे पवित्र सहलीला इंद्रायणी मातेच्या निर्मल पाण्यामध्ये डाऊ कंपनी यांसारख्या घातक कंपन्यांनी विषारी द्रव पदार्थ सोडले होते त्यासाठी व्यापक डाऊ हटाव आंदोलन करून इंद्रायणी शुद्ध ठेवण्याचे करण्याचे काम केले, याच वारकरी महामंडळाच्या वज्र मुठीने वसंत काळपांडे, आनंद यादव, यासारख्या विचारवंतांना संत विचारांचा अवमान प्रकरणी धडा शिकवला.
अशी राज्यव्यापी व देशव्यापी असलेली ही वारकरी महामंडळ संघटना असून या महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या विभागीय कार्याध्यक्ष पदी तितक्याच ताकदीने कार्य करणारे महंत श्री एकनाथ नामदेव महाराज उमरजकर व सल्लागार पदी महंत श्री नराशाम महाराज येवतीकर यांची निवड ही यथार्थ आणि पद व व्यक्ती याला योग्य न्याय देणारी आहे…
महाराजांच्या या निवडीबद्दल सर्व वारकरी व शिष्य परीवार यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“झुंजार ते एक विष्णुदास जगी”!!..