कंधार तालुक्यात चळवळ ,बहुजनाचा आवाज बनून दिवस रात्र सेवा बजावत मारोती मामा गेल्या अनेक वर्षापासून आपले नेटाने पुढे चालवत आहेत.मामा मित्र मंडळाची स्थापना करुन नांदेड जिल्हातील तरुणांचा आवाज बनण्याचे काम मित्र मंडळाच्या स्थापनेतून साधण्याचे ठरवून मारोती मामानी सेवेचा श्रीगणेशा केला.
आज कंधार लोहा तालुक्यातील बहूजनाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम मारोती मामा नेटाने करत आहेत.कोणत्याही गावातील सामाजिक प्रश्न असो अथवा दवाखाना असो मारोती मामा गायकवाड यांचा फोन सदैव चालुच राहतो आणि कार्यक्रर्तेही ज्या निष्ठने फोन लावला अथवा संकटात असताना धावा केली त्याला मामा पुरुन उरतात व मनातून सेवा बजावतात.
एखाद्ये प्रकारण मामाकडे आले आणि त्या कामात मामा कधी धावले नाहीत असे कधी झाले नाही.म्हणून मारोती मामा याचे नाव कंधार लोहा सह जिल्हातील कार्यक्रत्यांना माहीत आहे.
‘मामा ‘या टोपण नावातच मारोती मामा गायकवाड यांच्या कार्याची झळक दिसून येते.साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्य दीन दलीत समाजातील १०० जोडप्याचा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करुन संपुर्ण जिल्हा पिंजून काढला.प्रत्येक गावागावातून सामूहिक विवाह सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी करुन मारोती मामा गायकवाड यांच्या पाठीशी आहोत हे दाखवले .कार्यक्रमाची जय्यत तयारी ,बैठका ,नियोजन यातून मामाच्या नेतृवाची चुनूक समाजाच्या दृष्टीपथास पडली परंतु या कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली असताना कोरोना ने धोका दिला.लॉकडाऊन झाले आणि सामूहिक विवाह सोहळ्याला लॉकडाऊन करावे लागले .
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्य गावागावात जयंती महोत्सवास उपस्थित लावून समाजातील अडीअडचणी जाणून घेतल्या.त्या येणाऱ्या काळात राजकारणात सक्रीय होवून सोडवण्यासाठी अभ्यास केला आहे.
येणाऱ्या काळात राजकारणात सक्रीय होवून समाजातील प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मामाला संधी देण्याची गरज आहे.मग ते कोणतेही पद असो ..जिल्हा परीषद असो अथवा पंचायत समिती सदस्य
मांतगसमाजाचे आरक्षण लढा असो अथवा सामाजिक प्रश्न आसो ते सोडवण्यासाठी मारोती मामा यांना सर्वांनीच संधी देण्याची गरज आहे.मामामध्ये असणाऱ्या विविध भुमीका वटवताना पोलीस मित्र ,पत्रकार मित्र डॉक्टर मित्र ,व्यापारी मित्र अशा अनेक भुमिका पार पाडताना मामा नेहमीच सदैव समोर असतात.
त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना येणाऱ्या काळात मामा राजकीय मोठे पद मिळावे व मामाला खुल्या हाताने व मनाने सेवा करता यावी एवढिच एक इच्छा…
दिगांबर वाघमारे ,
संपादक युगसाक्षी व
मिर्झा जमीर बेग (अध्यक्ष )महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कंधार