राज्यत २० ऑक्टोबरपासून विविध रेल्वे गाड्या सुरू होणार, १५ ऑक्टोबरपासून बुकिंग करता येणार?

मुंबई;

राज्य सरकारने अनलॉक ५ मध्ये राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी सेवेला परवानगी दिल्यानंतर येत्या २० ऑक्टोबरपासून विविध रेल्वे गाड्या सुरू होणार आहेत. तसे नियोजन रेल्वेने केले आहे. या रेल्वे गाड्यांसाठी १५ ऑक्टोबरपासून आरक्षण सुरू होणार असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.

सुरू होणाऱ्या गाड्या अशा

मुंबई-नागपूर (सेवाग्राम एक्स्प्रेस),मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ, मुंबई-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस,मुंबई-अमरावती एक्स्प्रेस, मुंबई-गोंदिया (विदर्भ एक्स्प्रेस), मुंबई-पुणे (डेक्कन), मुंबई-पुणे (इंटर सिटी), मुंबई-पुणे (सिंहगड), मुंबई-पुणे (प्रगती), पुणे-नांदेड सुपरफास्ट एक्स्प्रेस, मुंबई-लातूर, मुंबई-सोलापूर (सिद्धेश्वर एक्स्प्रेस), मुंबई-कोल्हापूर (महालक्ष्मी एक्स्प्रेस), पुणे-सोलापूर (हुतात्मा एक्स्प्रेस), पुणे-नागपूर सुपर फास्ट,पुणे-नागपूर (गरीबरथ एक्स्प्रेस), कोल्हापूर- गोंदिया (महाराष्ट्र एक्स्प्रेस),पुणे-झेलम,पुणे – दरभंगा, मुंबई- पंजाब, मुंबई – मंगलोर, मुंबई – कराईकल एक्स्प्रेस.

#CMOMaharashtra #indianrelwe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *