नांदेड ;
मंगळवार 6 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 205 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 180 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 59 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 121 बाधित आले. आजच्या एकुण 829 अहवालापैकी 611 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 16 हजार 632 एवढी झाली असून यातील 13 हजार 213 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 879 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 33 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
या अहवालात शनिवार 3 ऑक्टोंबर रोजी नांदेड कौठा येथील 75 वर्षाचा एका पुरुषाचा, 4 ऑक्टोंबर रोजी लेबर कॉलनी नांदेड येथील 80 वर्षाचा एक पुरुषाचा खाजगी रुग्णालयात, तर 5 ऑक्टोंबर रोजी व्यंकटेशनगर नांदेड येथील 72 वर्षाचा एका पुरुषा, चीतगिरी भोकर येथील 84 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर अर्धापुर तालुक्यातील कामठा येथील 57 वर्षाचा एका पुरुषाचा, नायगाव येथील 50 वर्षाचा एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर 6 ऑक्टोंबर 2020 रोजी मुखेड तालुक्यातील रावणगाव येथील 32 वर्षाचा एका पुरुषाचा, छत्रपती नगर नांदेड येथील 60 वर्षाचा एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान या आठ बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 439 झाली आहे.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 13, अर्धापुर कोविड केंअर सेंटर 7, लोहा कोविड केंअर सेंटर 4, हदगाव कोविड केंअर सेंटर 4, माहूर कोविड केंअर सेंटर 4, मुखेड कोविड केंअर सेंटर 30, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 5, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 99, कंधार कोविड केंअर सेंटर 3, किनवट कोविड केंअर सेंटर 6, नायगाव कोविड केंअर सेंटर 7, खाजगी रुग्णालय 23 असे 205 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 82.53 टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 39, अर्धापूर तालुक्यात 1, कंधार 7, धर्माबाद 1, परभणी 3, हदगाव 1, किनवट 1, बिलोली 2, हिंगोली 3, यवतमाळ 1 असे एकुण 59 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 56, लोहा तालुक्यात 4, हदगाव 3, माहूर 1, उमरी 13, अर्धापूर 2, मुखेड 11, नायगाव 6, हिंगोली 2, नांदेड ग्रामीण 4, किनवट 7, देगलूर 1, धर्माबाद 1, परभणी 1, मुदखेड 4, कंधार 2, बिलोली 3, यवतमाळ 1, असे एकूण 121 बाधित आढळले. जिल्ह्यात 2 हजार 879 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 205, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 1 हजार 889 , जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 62, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड नवी इमारत येथे 28, आयुवैदिक शासकीय महा.कोविड रुग्णालय सेंटर 16, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 57, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 28, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 34, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 25, लोहा कोविड केअर सेंटर येथे 29, हदगाव कोविड केअर सेंटर 38, भोकर कोविड केअर सेंटर 26, कंधार कोविड केअर सेंटर येथे 19, मुदखेड कोविड केअर सेटर 14, माहूर कोविड केअर सेंटर 15, किनवट कोविड केअर सेंटर येथे 33, धर्माबाद कोविड केअर सेंटर 43, उमरी कोविड केअर सेंटर 57, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालयात दाखल 226, बारड कोविड केअर सेंटर 1, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 20, लातूर येथे संदर्भित 2, औरंगाबाद येथे संदर्भित 2, मुंबई येथे संदर्भित 2, निजामाबाद येथे संदर्भित 5, आदिलाबाद येथे संदर्भित 2 झाले आहेत.