जीवन आधार ब्लड बँकेला NACO चे मानांकन प्राप्त; रक्तदात्याचे मानले आभार

 

सर्वात श्रेष्ठदान रक्तदान असे आपण मानतो कारण मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही ही गरज ओळखून जीवन आधार ब्लड बँकेची स्थापना करण्यात आली. त्यामुळे वेळी-अवेळी रुग्णांना आवश्यक ते रक्त उपलब्ध करून देण्याचे समाजकार्य आमच्या हातून घडत गेले यास माय-बाप रक्तदात्यांचे अनमोल योगदान लाभत गेले .

विविध सामाजिक उपक्रमात जीवन आधार ब्लड बँकेला बोलावून रक्तदानाला श्रेष्ठ मानून आपण रक्तदान करीत गेलात आम्ही ते प्रामाणिकपणे रुग्णांच्या सेवेसाठी जीवन आधार बनलो आणि या सेवेची दखल घेवून जीवन आधार ब्लड बँकेला NACO हे मानांकन प्राप्त दिले आहे.

हे आम्ही अगदी नम्रपणे हा बहुमान आपल्या सर्व ज्ञात-अज्ञात रक्तदात्यांना समर्पित करीत आपल्या सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देत आहोत आपण त्याचा स्वीकार करावा ही विनंती.

आपली विश्वास हीच आमची ओळख
जीवन आधार ब्लड बँक
नांदेड .

आपला
चेअरमन लक्ष्मीकांत पाटील कळणे जनसंपर्क अधिकारी राज सरकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *