लोहा / प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या महाभयंकर आजराच्या संकट काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न म्हणूनकरता इतरांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र सेवा करणारे लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका चालकांचा नांदेड चे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या सुचनेनुसार नगर आध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा नगरपालिकेच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक छत्रपती दादा धुतमल यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला.
गेल्या आठ महिन्यापासून देश व राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे या आजारामुळे अनेकांचे बळी गेले या आजाराला जनता घाबरून जात असून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे शहरातील जनतेचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी नगर परिषद च्या वतीने नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी गेल्या सहा महिन्यांपासून योग्य उपाय योजना राबवून जनतेची काळजी घेतली या काळात शहरातील व तालुक्यातील रुग्णांची सेवा आरोग्य विभागणी उत्कृष्ट पणे केली या आरोग्य सेवेत रुग्णवाहिका चालकांचा मोठा वाटा आहे ,
त्यांनी स्वतःच्या जीवाची कुटूंबाची तमा न बाळगता इतरांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव संकटात टाकून कोरोना बाधीत रुग्णांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण भागातून व शहरातून रुग्णालयात तसेच नांदेड येथिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून आरोग्य सेवा दिली त्याबद्धल खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सूचनेवरून नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली लोहा न पा च्या वतीने रुग्णवाहिका 102 व 108 च्या चालकांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक छत्रपती दादा धुतमल यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहक चालक संतोष कविर बालाजी घोडके सिद्धार्थ ससाणे नामदेव केंद्रे यांचा प्रमाणपत्र व पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी नगरसेवक दत्ता भाऊ वाले नबी शेख संदीप दंमकोडवार नारायण यलरवाड अमोल सावकार व्यवहारे बालाजी शेळके ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाँ प्रशांत जाधव डाँ दिनेश मोटे डाँ लोहारे डाँ मोरे सिद्धेराय ब्रदर यांच्या सह गुलाम शेख अजय भिसे गणेश बगाडे विनय चंदेवाड आदी उपस्थित होते