कंधार – म.सिकंदर
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय मान्यता प्राप्त मौलाना आजाद एज्युकेशन फाउंडेशन द्वारे अल्पसंख्यांक समाजातील मुलींना बेगम हजरत महल शिष्यवृत्ती साठी ऑनलाइन अर्ज मागवणे सुरु आहे.
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनीनी या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन कंधार एम.आय.एम तालुका अध्यक्ष मो. हमेदोद्दिन यांनी केले आहे.
मुस्लीम,बौद्ध,शीख,पारशी,जैन या समाजातील अल्पसंख्यांक समाजातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून बेगम हजरत महल शिष्यवृत्ती दिली जाते.इ.९ वी ते १२ वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीना हि शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती अंतर्गत ९ वी व १० वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीना वार्षिक ५००० रुपये, तसेच इ.११ वी व १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीना ६००० रुपये ची आर्थिक मदत दिली जाते.
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागवणे सुरु झाले असून.अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोंबर २०२० आहे. अर्ज दाखल करण्याची http://bhmnsmaef.org/maefwebsite/ या संकेतस्थळावर भेट द्या किंवा आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून नोंदणी करावी . अल्पसंख्यांक समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थिनीनी या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन मोहम्मद हामेदोदीन हुसैनी एम.आय.एम तालुका अध्यक्ष कंधार यांनी केले आहे.