नांदेड ;
शासन स्तरावरून दिव्यांगांच्या कल्याण ” व पुनर्वसनासाठी दरवर्षी विविध कल्याणकारी व वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात परंतु त्या योजणांची आणि शासन निर्णयांची नांदेड जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी शेकडो दिव्यांगांना सोबत घेऊन गत अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने विविध आक्रमक आंदोलने करत लढा देत संघर्ष सुरू केला आहे. त्यात बऱ्यापैकी न्याय पण मिळाला. परंतु शासकीय अधिकार्यांच्या बदल्या आणि दिव्यांगांप्रती उदासिनता यामुळे दिव्यांग शासनाच्या विविध योजनांपासून कोसो दुरच राहिला एवढेच काय तर कोरोना या महामारीच्या काळातही दिव्यांगांवर उपासमारीचीच वेळ या सर्वांगाने दिव्यांगत्व धारन केलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी आणली, याच्याच निषेधार्थ बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती नांदेडच्या वतीने दि 9 आक्टोंबर 2020 रोजी महामहीम राष्ट्रपती-पंतप्रधान-राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना एकुण 19 मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले आहे.
परंतु दिव्यांगाच्या कोणत्याही समस्या आणि मागण्यांची शासनाने आत्तापर्यंत कोणती पूर्तता केली नाही, त्यामुळे दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी नांदेड शहरातील विविध ठिकाणी बेरोजगार दिव्यांगांचे विद्रोही आंदोलन छेडणार असल्याचा इशारा अध्यक्ष राहुल साळवे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
काय आहेत जिल्ह्यातील दिव्यांगांच्या प्रमुख मागण्यां?
◾️नांदेड जिल्ह्यात दिव्यांग कायदा १९९५ आणि सुधारीत दिव्यांग कायदा २०१६ ची अंमलबजावणी झाली पाहिजे.
◾️तसेच ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महिला व बालविकास विभाग आणि महसूल व वन विभाग या महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयांची पुर्णता अंमलबजावणी झाली पाहिजे.
◾️दिशाभुल करणारे नांदेड दिव्यांग ऍप, गतवर्षी मोठा गाजावाजा करत संपूर्ण नांदेड जिल्हाभर शिबीर आयोजित करून अद्याप दिव्यांगांना साहित्य वाटप झाले नाही ते त्वरित वाटप करण्यात यावे.
◾️नांदेड जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकाकडुन तसेच अपंग वित्त व विकास महामंडळाकडून दिव्यांगांना कुठल्याच प्रकारचे कर्ज पुरवठा केला जात नाही त्याची त्वरित अंमलबजावणी करावी.
◾️अपंग – अव्यंग विवाह प्रोत्साहनपर योजणेची रक्कम वाढवुन दोन दिव्यांगांनी एक मेकांशी विवाह केल्यास त्यांना बक्षीसोत्पर १ लाख ५१ हजार रुपये देऊन गौरविण्यात यावे.
◾️रेल्वे पोलिसाकडुन दिव्यांगांला मारहाण प्रकरणी अद्याप निलंबन झाले पाहिजे.
◾️आमदार – खासदार निधीतून दिव्यांगांवर अद्याप खर्च झाला नाही तो खर्च झाला पाहिजे.
◾️दरमहा संजय गांधी निराधार माणधन मिळावे.
शासनाच्या विविध घरकुल योजनेचा लाभ दिव्यांगांना
मिळवा इत्यादीसह अनेक मागण्यांची नोंद सदरील निवेदनात आहे.
सदरील मागण्या जिल्हा प्रशासनाने त्वरित मान्य कराव्या अन्यथा दि 2 नोव्हेंबर 2020 रोजी नांदेड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालय येथे एकाच क्षनी विविध प्रकारचे विद्रोही आंदोलने करून अधिका-यांना “रत्ताळे” आणि दिव्यांग साहित्य ज्यात अंध काठी, अंध चष्मा, कुबडी, लाठी, मुकबधीर – कर्णबधीर मशीन भेट देण्यात येणार असल्याच अध्यक्ष राहुल साळवे यांनी म्हटले आहे.
सदरील निवेदनावर राहुल साळवे, नागनाथ कामजळगे, अमरदिप गोधने, संजय धुलधाणी, अब्दुल माजीद शेख चांद, कार्तिक भरतीपुरम, प्रदिप हणवते, सय्यद आरीफ सय्यद अली आणि मुंजाजी कावळे यांच्या सह्या आहेत.
तसेच या आंदोलनात जास्तीत जास्त दिव्यांगांनी सहभागी होण्याचे आवाहन सुनील जाधव,रवि कोकरे,व्यंकट कदम,आत्माराम राजेगोरे,संतोष पवार,वैभव पईतवार,भोजराज शिंदे, जयपाल आडे,आनंदा माने, विष्णु जायभाये,भाऊसाहेब टोकलवाड, विठ्ठल सुर्यवंशी, गणेश वर्षेवार,सतीश सरोदे,कमलबाई आखाडे,गोदावरी जंगीलवाड,भाग्यश्री नागेश्वर,मनिषा पारधे, कल्पना सप्ते आणि सविता गावटे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.