कंधार ;
नांदेड जिल्ह्याचे नवीन पोलीस अध्यक्ष प्रमोद शेवाळे यांनी कंधार पोलीस स्टेशनला दिनांक 13 ऑक्टोबर रोजी अचानक धावती भेट घेऊन कर्मचाऱ्यांना अडीअडचणी व कोरोना संदर्भाने घ्यावयाची दक्षता तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्ह्याची माहिती घेतली तसेच पोलीस स्टेशन परिसराची स्वच्छता याविषयी माहिती घेऊन समाधान व्यक्त केले असल्याची माहीती पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.
आगामी सण ,उत्सवाच्या निमित्ताने पोलीस बांधवांना कोरोना संदर्भाने घ्यायची दक्षता त्याचबरोबर सण-उत्सव साजरे करण्या बाबत मार्गदर्शन यावेळी पोलीस अधिक्षक प्रमोद शेळके यांनी केले.
यावेळी सदर कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव , महीला सहायक पोलिस निरीक्षक महिला मनिषा पवार आदी सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांना मानवंदना देण्यात आली .पोलीस स्टेशनच्या कामकाजा बाबत व स्वच्छता याबाबत समाधान व्यक्त केले.