लोहा / प्रतिनिधी
दि.14 ऑक्टोंबर 2020 रोजी लोहा तालुक्यातील मौ. हरसद येथे सम्यक बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. हरसदचे भूमिपुत्र तथा लोहा पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष उपसभापती नरेंद्र बाबाराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून व नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे हरसद येथे जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा हरसद वासियांना मिळाली म्हणून
संपूर्ण भारत बौद्धमय व्हावा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार व्हावे बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी यासाठी हरसदचे भूमीपुत्र फुले -शाहू- आंबेडकरी चळवळीतील सक्रिय नेते पॅथर पॉवरचे प्रदेशाध्यक्ष तथा लोहा पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र गायकवाड यांच्या पुढाकारातून फारच सुंदर व आकर्षक असे बुद्ध विहारांची निर्मिती करण्यात आली असून या बुद्धविहाराचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे
व या बुद्धविहाराला सम्यक बुद्ध विहार असे नाव देण्यात आले आहे. या सुंदर व आकर्षक बुद्धविहारांचा आज दि.१४ ऑक्टोंबर या ऐतिहासिक दिनी लोकार्पण सोहळा होत असून याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या तथा जिल्हा परिषद सदस्या सौ प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहा पंचायत समितीचे सभापती आनंदराव पाटील शिंदे राहणार असून
या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी सोशल डिक्टेशन पाळून उपस्थित राहावे व तोंडाला मास्क लावावा व हाताला सॅनिटायझर लावावे असे आव्हान कार्यक्रमाचे संयोजक तथा लोहा पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र गायकवाड यांनी केले आहे.