लोहा नगरीचे शिल्पकार प्रथम नगराध्यक्ष दिवंगत माणिकराव पाटील पवार यांच्या पुण्यतिथी निमित्त कोरोना योध्दयाचा सन्मान व एक लाखाचे विमा

पवार कुटुंबाची तिसऱ्या पिढीने जोपासली सामाजिक बांधिलकी

लोहा/ प्रतिनिधी
लोहा नगरीचे शिल्पकार तथा प्रथम नगराध्यक्ष यांच्या 15 व्या पुण्यतिथी निमित्त लोहा शहरातील कोरोना योद्धयाचा सन्मान करून त्यांचा एक लक्ष रुपयाचा अपघाती विमा पवार कुटुंबियांच्या वतीने माणिकराव पाटील पवार यांचे नातू युवा सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार यांनी उतरविला आहे.


आज दिनांक १३ ऑक्टोंबर रोजी लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात लोहा नगरीचे शिल्पकार तथा प्रथम नगराध्यक्ष दिवंगत माणिकराव पाटील पवार यांची 15 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली . दिवंगत माणिकराव पाटील पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोहा ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स चालक व सर्व कर्मचारी यांचा एक लाख रुपयाचा अपघाती विमा दिवंगत माणिकराव पाटील पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त काढण्यात आला.


यावेळी कार्यक्रमास उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार लोहा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत जाधव, कार्यक्रमाचे आयोजक तथा माणिकराव पाटील पवार यांचे नातू सुधाकर पाटील पवार, मधुकर पाटील पवार, नगरसेवक भास्कर पाटील पवार, गणेश पवार , सुजित चव्हाण, मुख्याध्यापक गजानन चव्हाण, अंकुश पवार,राम पवार , दिनेश तेलंग ,ओम पवार, डॉ.लोहारे, डॉ. गजानन पवार
आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना माणिकराव पाटील यांचे नातू युवा सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार म्हणाले की माणिकराव पाटील पवार यांनी जो समाजसेवेचा वसा चालविला तो आम्ही जपण्याचा प्रयत्न करीत आहोत समाजाचे आपण काहीतरी देणे-घेणे लागतोत माणिकराव पाटील पवार यांनी 1960 मध्ये लोहा शहरात सामाजिक परिवर्तन घडून आपल्या हॉटेल चे उद्घाटन एका दलित समाजाच्या व्यक्तीच्या हस्ते केले होते. माणिकराव पाटील पवार यांचा लोहा शहराच्या विकासात मोलाचा वाटा आहे शहराच्या विकासाची मुहूर्त त्यांनी रोवली आहे अनेक गोरगरिबांना संकट काळी मदत केली आहे यात दुष्काळ असो की कोणताही धार्मिक सामाजिक कार्यक्रम असो किंवा वैयक्तिक कार्यक्रम असो त्यांनी नेहमी लोहा शहराचे व येथील नागरिकाचे हीत जोपासले आहे . त्यांचा वसा जोपासत आम्ही आमच्या परीने शक्य होईल तेथे करीत आहोत कोरोना महामारीच्या काळात लोहा ग्रामीण रुग्णालयातील कोवीड सेंटर मधील सर्व डॉक्टर्स, नर्स, वाहन चालक, लोहा स्टेशन चे सर्व पोलिस अधिकारी कर्मचारी, तसेच लोहा शहरातील सर्व पत्रकार बांधव यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य केले तेव्हा यांचा सन्मान झाला पाहिजे म्हणून या सर्व १५० जणांचा आम्ही पवार कुटुंबियांच्या वतीने एक लक्ष रुपयांचा विमा उतरविला आहे असे सुधाकर पाटील पवार म्हणाले.
तसेच यावेळी नगरसेवक भास्करराव पाटील पवार यांनी ही मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश तेलंग यांनी केले तर आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जाधव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *