हिंगोली डायटचे प्राचार्य भा.भ.पुटवाड यांच्या कडून बबन दांडेकर सरांचा सत्कार

हिंगोली :

जि.प. प्रा.शा.बेलूरा येथील उपक्रम शील शिक्षक मा.बबन दांडेकर सर यांनी ‘निष्ठा’ या प्रशिक्षणात सुलभक म्हणून यशस्वीपणे आपले कार्य पार पाडले. त्यामुळे हिंगोली येथील डायटचे प्राचार्य मा.भा.भ.पुटवाड सर यांनी बबन दांडेकर सरांचा मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून सत्कार केला आहे.

मा.बबन दांडेकर सर हे त्यांच्या कल्पकदृष्टीतून वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रेरित करीत असतात. ते एक चांगले कवी, गायक म्हणून ही त्यांची ख्याती जिल्हाभर पसरलेली आहे. एवढेच नाही तर त्यांचे हस्ताक्षर खुप सुंदर आणि आकर्षक आहे.ह्यामुळे ते नेहमी आपल्या कार्यामुळे समाजात अभिनंदनाचे मानकरी ठरतात.

त्यांच्या ह्या महत्त्वपूर्ण कार्याचे कर्मचारी वर्ग पालक वर्ग तसेच कवी मित्रमंडळी बाबुराव पाईकराव, एम.टी गायकवाड, अंबादास ईंगोले, गंगाधर ढवळे,अनुरत्नजी वाघमारे,पांडुरंग कोकुलवार,नागोराव डोंगरे,कैलास धुतराज आणि सुधा जाधव यांच्याकडून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *