नांदेड (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी ग्रंथालय काँग्रेस विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री उमेश पाटील साहेब यांनी राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाची एकूण २९ पदाधिकाऱ्यांची जिल्हा प्रभारी यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये नांदेड जिल्हा अध्यक्ष संतोष दगडगावकर यांची परभणी व ठाणे जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दि. ९ आॅक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्रंथालय विभागाच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
या निवडीचे स्वागत नांदेड मनपा चे माजी विरोधी पक्षनेते मा.जिवण पाटील घोगरे व पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस तथा युवक मा.जिल्हा अध्यक्ष वंसत पाटील सुगावे ,युवक प्रदेश सचिव बाळासाहेब भोसीकर, सदस्य स्वप्निल पाटील इंगळे, लोकहित लाईव्ह न्यूज चे संपादक साहेबराव कोलंबीकर, राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्ष अंकुश पाटील शिखरे,नांदेड तालुका अध्यक्ष विष्णु उदावंत,उमरी गजानन पवळे, नायगाव बालाजी होळकर,भोकर शिवानंद मठपती व सर्व श्री प्रा.महेश स्वामी, राजेश भाऊ लहानकर,उत्कर्ष भोसीकर, भुषण टिपरसे,विक्की गायकवाड उत्तम शिंदे,अॅड.आंनद सुर्यवंशी,शिवचरण ठाकुर,उन्हाळे सर,प्रमोद पंडित, किरण नांदेडकर,मंजुषा चव्हाण यांनी केले असून सर्व नवनियुक्त जिल्हा प्रभारी पदाधिकारी हे आदरणीय खा. शरद पवार साहेबांचे विचार तळागळापर्यंत पोहचवून पक्ष बळकट करतील असा विश्वास व्यक्त करत ना. जयंत पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.