माझे कुटूंब माझी जबाबदारी कोरोना …नांदेड जिल्ह्यात दि. 13 रोजी 108 कोरोना बाधितांची भर, 4 जणांचा मृत्यू

   

 नांदेड;

मंगळवार 13 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 271 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 108 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 47 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 61 बाधित आले.  आजच्या एकुण 861 अहवालापैकी 734 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 17 हजार 602 एवढी झाली असून यातील  14  हजार 903 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

एकुण 2 हजार 132 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 50 बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे.  या अहवालात चार जणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवार 12 ऑक्टोंबर रोजी नाळेश्वर नांदेड येथील 54 वर्षाच्या एका पुरुषाचा, लोहा तालुक्यातील देऊळगाव येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे तर चेतापूर नांदेड येथील 85 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, तर हडको नांदेड येथील 66 वर्षाच्या एका महिलेचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 461 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 2, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 3, मुखेड कोविड केंअर सेंटर 14, हदगाव कोविड केंअर सेंटर 5, लोहा कोविड केंअर सेंटर 10, मांडवी कोविड केंअर सेंटर 5, किनवट कोविड केंअर सेंटर 2, लातूर येथे संदर्भीत 4, अदिलाबाद येथे संदर्भीत 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 9, बिलोली कोविड केंअर सेंटर 11, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 156, नायगाव कोविड केंअर सेंटर 5, माहूर कोविड केंअर सेंटर 3, उमरी कोविड केंअर सेंटर 10, खाजगी रुग्णालय 25, निजामाबाद येथे संदर्भीत 4, परभणी येथे संदर्भीत 1 असे 271 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 87.48 टक्के आहे.


आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 31, भोकर तालुक्यात 1, लोहा 2, देगलूर 1, बिलोली 2, कंधार 2, नांदेड ग्रामीण 1, मुदखेड 2, किनवट 2, उमरी 1, हिंगोली 2 असे एकुण 47 बाधित आढळले.  तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 32, लोहा तालुक्यात 3,  मुदखेड 1, भोकर 1, मुखेड 6, उमरी 1, नायगाव 2, नांदेड ग्रामीण 7, अर्धापूर 1, किनवट 4, बिलोली 1, कंधार 1, धर्माबाद 1 असे एकूण 61 बाधित आढळले. जिल्ह्यात 2 हजार 132 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 134, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 1 हजार 298, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 64, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 45, हदगाव कोविड केअर सेंटर 24, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 42, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 30, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 64,  मांडवी कोविड केअर सेंटर 8, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 8, लोहा कोविड केअर सेंटर येथे 20, बारड कोविड केअर सेंटर 3, मुदखेड कोविड केअर सेटर 11, माहूर कोविड केअर सेंटर 21, किनवट कोविड केअर सेंटर येथे 46,

धर्माबाद कोविड केअर सेंटर 19, उमरी कोविड केअर सेंटर 37, कंधार कोविड केअर सेंटर येथे 15, अर्धापूर कोविड केअर सेंटर 24, भोकर कोविड केअर सेंटर 17,  खाजगी रुग्णालयात दाखल 202 झाले आहेत. मंगळवार 13 ऑक्टोंबर रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 80, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 77 एवढी आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *