नांदेड;
अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 अन्वये 1 ऑक्टोंबर पासून उत्पादन व विक्रीसाठी साठविलेला मावा, मिठाई व तत्सम खाद्य पदार्थाच्या दर्शनी भागी, लेबरवर, ट्रेवर, पॅकेटवर बॉक्सवर अन्नपदार्थांच्या उत्पादनाचा दिनांक व वापर कोणत्या दिनांकापर्यत करावयाचा आहे हे नमूद करणे बंधनकारक आहे, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त, तु.चं. बोराळकर यांनी दिल्या आहेत.
मावा, मिठाई व तत्सम खाद्य पदार्थावर दिनांक सर्व ग्राहकांना सुस्पष्ट दिसेल असा नमूद करावा. खाद्य पदार्थ किती दिवस वापरावे याबाबतही ग्राहकांना स्पष्ट सूचना द्याव्यात. मावा, मिठाई दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि स्वच्छ वातावरणात तयार करुन विक्री करावी. उत्पादक विक्रेते कामगार, मालक रोगमुक्त असावेत. कोणत्याही परिस्थितीत शिळी, मुदतबाह्य मिठाईची विक्री करु नये. या सर्व सूचनांचे जनहितार्थ काटेकोर पालन करावे अन्यथा सूचनेचे उल्लंघन आढळल्यास संबंधित कायदेशिर कार्यवाहीस पात्र राहील असेही अन्न व औषध प्रशासन विभागाने कळविले आहे.
#nanded #नांदेड