मन्याड नदीत उडी मारुन तरुणाची आत्महत्या
कंधार ;
रंगारगल्ली कंधार येथिल तरुण शेतकरी चंद्रशेखर शंकरराव कुंभारगावे (वय ३० वय)यांनी दि.१७ अॉक्टोबर रोजी दुपारी बहाद्दपुरा येथिल पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केली.
मयत चंद्रशेखर कुंभारगावे हा दि.१५ अॉक्टोबर पासून बेपत्ता होता .दि.१७ रोजी बहादरपुरा येथिल मन्याड नदी पुलाजवळ पाण्यावर शव तरंगत असल्याचे लक्षात आल्यानंतर मयताचा भाऊ संतोष कुंभारगावे यांनी कंधार पोलीसात खबर दिली.दिलेल्या फिर्यादी वरुन कंधार पोलीसात ३६/२०२० कलम १७४ भादवी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मयत चंद्रशेखर याचे येथिल ग्रामिण रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले.रात्री उशीरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत चंद्रशेखर यांच्या पश्चात पत्नी ,लहान मुलगा ,आई वडील ,भाऊ असा मोठा परीवार आहे.
या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ सुभाष चोपडे ,व पो.हेकॉ बालाजी केंद्रे हे करत आहेत.