खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते महंत एकनाथ नामदेव महाराज यांचा सत्कार
कंधार ; दिगांबर वाघमारे
महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या मराठवाडा प्रांत कार्याध्यक्ष पदी श्री क्षेत्र संत नामदेव महाराज संस्थान उमरज ता कंधार चे मठाधिपती श्री गुरू महंत एकनाथ नामदेव महाराज त्यांची निवड झल्या बद्दल त्यांचा सत्कार
नांदेड लोकसभेचे खासदार मा प्रतापराव पाटील चिखलीकर, मुखेड विधानसभेचे आमदार डॉ तुषार जी राठोड,कृष्णा पापींनवार,भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड,विनोद तोरणे आदीची यावेळी उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने मंहत एकनाथ नामदेव महाराज यांचा सत्कार
महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या मराठवाडा प्रांत कार्याध्यक्ष पदी श्री क्षेत्र संत नामदेव महाराज संस्थान उमरज ता कंधार चे मठाधिपती श्री गुरू महंत एकनाथ नामदेव महाराज त्यांची निवड झल्या बद्दल त्यांचा सत्कार कंधार येथिल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला .
यावेळी मठाधिपती श्री गुरू महंत एकनाथ नामदेव महाराज यांनी वारक-यानाही संघटनेची गरज का आहे यांची माहीती दिली.तसेच सरकारने देशातील दारुचे दुकाने उघडण्यास परवानगीच नाही तर उघडून दिले पण वारकरी ,पुजारी यांनी मंदीर उघडण्यासाठी मागणी आंदोलने करुनही अद्याप उघडले नाही ही शोकांतीका असून सरकारचे डोके ठिकाण्यावर नाही .तेव्हा सरकारने वेळीच जागे होवून तात्काळ मंदीर खुले करावीत असे यावेळी सांगितले .
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार प्रसंगी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष मिर्झा जमिर बेग ,सचिव दिगांबर वाघमारे ,एस.पी.केंद्रे ,माधव भालेराव ,प्रा.सुभाष वाघमारे ,प्रा.भागवत गोरे ,मं.सिंकदर,आदीसह संभाजी गडंबे सह मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रा.सुभाष वाघमारे यांनी केले.
video news *****