विजयादशमीच्या मुहूर्तावर कारेगाव येथील हाॅटेल अमोल रेस्टॉरंटचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते उदघाटन

हॉटेल अमोल रेस्टॉरंटने खवय्यांसाठी खास ब्रँड बनवावा – खा. चिखलीकर

लोहा / प्रतिनिधी
हॉटेल अमोल फॅमिली रेस्टॉरंटने खवय्यांसाठी खास विशेष चांगला दर्जेदार एखांदा ब्रँड बनवावा असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कारेगाव येथील हॉटेल अमोल फॅमिली रेस्टॉरंट च्या उद्घाटनप्रसंगी केले.


नांदेड लातूर या राष्ट्रीय महामार्गावरील लोहा तालुक्यातील कारेगाव येथे आज दिनांक 25 ऑक्टोंबर रोजी दसरा विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर उद्योजक धनाजी पाटील दिघे व माधवराव पाटील पावडे यांनी हॉटेल अमोल फॅमिली रेस्टॉरंट सुरू केले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नांदेड जिल्ह्याची लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भुंजग पाटील डक, भारतीय दूरसंचार समितीचे सल्लागार सदस्य साहेबराव पाटील काळे, लोहा पंचायत समितीचे सभापती आनंदराव पाटील शिंदे, उपसभापती नरेंद्र गायकवाड, लोहा न.पा.चे उपाध्यक्ष शरद पाटील पवार, माजी जि.प. सदस्य गणेशराव मोरे ,लोहा बाजार समितीचे उपसभापती बळीराम पाटील जानापुरीकर , माजी तालुका कृषी अधिकारी विश्वाभंर मंगनाळे ,पारडीचे पॅनल प्रमुख माधवराव पाटील पवार, राम पाटील किरवले, युवक काँग्रेसचे दत्ता दिघे, भाजपाचे नांदेड दक्षिण तालुकाध्यक्ष सुनील मोरे, माजी उपसभापती लक्ष्मणराव बोडके, नगरसेवक भास्करराव पाटील पवार ,दता वाले, नामदेव चव्हाण ,बी.डी. जाधव ,कारेगावचे सरपंच शाम पाटील किरवले,, भगवानराव पाटील किरवले, माजी सरपंच मालोजी गायकवाड, रावसाहेब कारेगावकर ,आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी पुढे बोलताना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, या राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल अमोल रेस्टॉरंट आहे . वांरगा फाट्यावर जसे गुलाब जामून प्रसिद्ध आहे तसे हॉटेल अमोल रेस्टॉरंटने खवय्यांसाठी चांगले ब्रँड बनवावे लोकं पैशाला बघत नाहीत त्यांना सुविधा पाहिजे चांगली क्वालिटी पाहिजे नांदेड येथून लोक येथे आले पाहिजे . या कार्यक्रमाला आम्हा सर्वांना बोलावले मी आम्ही सर्व पक्षाच्यावतीने हाॅटेल अमोल रेस्टॉरंटचे उद्घाटन झाले असे जाहीर करतो व तुम्हाला पुढील कार्यास शुभेच्छा देतोत असे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी केले तर आभार धनाजी पाटील दिघे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *