मराठवाडा पदवीधर मतदार संघातील मतदारांशी भेटीगाठी व मतदार संपर्क आभियानात कंधार येथे शिरीषजी बोराळकर यांनी घेतला आढावा

कंधार ; सागर डोंगरजकर

मराठवाडा पदवीधर मतदार संघातील मतदारांशी भेटीगाठी व मतदार संपर्क आभियान अंतर्गत दि.२६ रोजी कंधार येथील तालुका सर्कल निहाय भाजपा पदाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्या प्रसंगी पदवीधर मतदार संघ भाजपा , मराठवाडा नोंदणी प्रमुख
शिरीषजी बोराळकर यांनी
पदवीधर नाव नोंदणी व अद्याप न झालेली नोंदणी , निवडणूक रचना , आश्या विविध विषयांवर वर चर्चा करुन आढावा घेतला.

खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कंधार येथिल संपर्क कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीला त्यांच्या समवेत राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य
वारकड गुरुजी,भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ. चित्रलेखा ताई गोरे पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष माधवराव पाटील उच्चेकर,भाजपा जिल्हाउपध्यक्ष शंकरराव नाईक, कंधार नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष
जफरोदीन बाहोदीन ,कंधार तालुका अध्यक्ष भगवान राठोड, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाबूराव केंद्र ,संजय देशमुख,मधुकरराव पाये
भाजपा शहर अध्यक्ष ॲड.गंगाप्रसाद यन्नावार ,साईनाथ कपाळे ,गिरीधारी केंद्रे,शिंदे सर,व्हि.जी.कदम , मधुकर डांगे,साईनाथ कोळगीरे , किसनराव डफडे,संतोष धुमाळ पाटील,
व सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *