लोहा /प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय मराठी पत्रकार संघटना ही संघटनेचे विसवस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली देशात राज्यात काम करत आहे संघटनेचे विभागीय सचिव विजय जोशी जिल्हा अध्यक्ष प्रदीप नागापूरकर यांच्या आदेशावरून या संघटनेशी संलग्न असलेली लोहा मराठी पत्रकार संघाची बैठक लोहा येथे घेण्यात येऊन तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
या बैठकीचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यीक कवी पत्रकार बापू गायकर हे होते. यावेळी लोहा मराठी पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष पदी तरुण भारत चे प्रतिनिधी डी एन कांबळे यांची तर कार्याध्यक्ष पदी देशोन्नती चे शेख मुर्तुजा यांची आणि सचिव म्हणून सकाळ चे बापू गायकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली यात अध्यक्ष डी एन कांबळे, कार्याध्यक्ष शेख मुर्तुजा, सचिव बापू गायकर, उपाध्यक्ष बाळासाहेब कतुरे ,उपाध्यक्ष जगदिश कदम, कोषाध्यक्ष म्हणून सामना चे पत्रकार संतोष तोंडारे , सहसचिव अनवर शेख ,सह कोषाध्यक्ष अशोक सोनकांबळे यांची तर सल्लागार म्हणून जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे ,साहेबराव सोनकांबळे ,सुरेश महाबळे यांची निवड करण्यात आली सदस्य म्हणून प्रदीप कांबळे, केशव पवार, अनिकेत सुरनर, शेख हकीम ,शेख सुलतान ,शेवडी चे पत्रकार गंगाराम तेलंग , पेनूरचे पत्रकार वीरभद्र एजगे, एडके , माळाकोळी चे विनायक जोशी सोनखेड चे पत्रकार गजानन मोरे ,माणिक मोरे , आदींची निवड करण्यात आली असून वरिष्ठांच्या पुढील आदेशानुसार लवकरच सर्कल निहाय संघटना बांधणी करून सर्कल च्या पत्रकारांना बहुमान देण्यात येणार आहे .
** संघटनेच्या विचार धारेवर पत्रकाराचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध नूतन अध्यक्ष डी.एन. कांबळे
गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय मराठी पत्रकार संघटना ही संघटनेचे विसवस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काम करीत आहे संघटनेने विविध विषयांवर आवाज उठऊन पत्रकारा चे प्रश्न मागण्या शासन दरबारी लावून धरून ते सोडवले आहेत विभागीय सचिव विजय जोशी जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप नागापूरकर सुभाष लोने प्रकाश कांबळे यांनी संघटनेचे उत्कृष्ट काम करून राज्यात जिल्ह्याचे नाव लौकिक केले त्यांच्या नेत्रत्वाखाली लोहा येथील पत्रकार संघटना गेली वीस वर्षांपासून काम करीत आहे यापुढे ही काम करणार असून संघटनेच्या विचारधारे प्रमाणे तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे सध्या कोरोना महामारी असल्याने बैठका घेणे वरिष्ठांना श्यक्य नव्हते म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यकारणी संदर्भात बैठक घेऊन अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या लोहा मराठी पत्रकार संघांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली यात पंधरा पत्रकार अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे नोंदणीकृत सदस्य आहेत इतर पत्रकारांनी या संघटनेत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे अशी माहिती नूतन अध्यक्ष डी. एन. कांबळे यांनी दिली