सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

नांदेड-

तालुक्यातील आॅक्सफर्ड इंटरनॅशनल स्कुल वाडी बु. येथील शाळेत सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पर्यवेक्षक सलीम गुंजवार, गाईडर आश्विनी येतेजवार, लेखापाल शेख जावेद, भगवंत जोशी, संजय जाधव यांची उपस्थिती होती.

भारताचे पहिले गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५ वी जयंती ही राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा करण्यात आला. प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन केले. तसेच उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मता व अखंडतेची शपथ देण्यात आली.

कार्यकमाचे सूत्रसंचालन स्काऊटर एकनाथ कार्लेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *