आरपीआय चे कनिष्क कांबळे यांना आमदारकी(?)


मुंबई दि (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या विधान परिषद सदस्य पदावर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून महाराष्ट्र राज्यातील व देशातील युवा उमलते नेतृत्व माजी आमदार पँथर दिवंगत टी एम कांबळे यांचे सुपुत्र कनिष्क कांबळे यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून हाती आली आहे.


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, दिवंगत माजी आमदार टी एम कांबळे यांचे सुपुत्र कनिष्क कांबळे यांनी राज्यपाल नियुक्त आमदारकी निश्चित झाल्याची चर्चा राजकीय गोटात पसरली असून कनिष्क कांबळे एक उच्चशिक्षित व्यक्तिमत्व असून अश्या युवा वर्गाला आमदारकी दिल्यास सकारात्मक राजकारणाच्या प्रवाह गती येऊन तरुण वर्ग राजकारणाकडे आकर्षिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.


पँथर टी एम कांबळे यांच्या कारकिर्दीत कोणत्याही प्रकरणाचे गालबोट लागले असून स्वछ व पारदर्शक समाजसेवा करून समाजात त्यांची आगळीवेगळी प्रतिमा निर्माण झालेली आहे, त्यांचिंच प्रतिमा म्हणून कनिष्क कांबळे यांनी जनतेतून पाहण्यात येते.


आंबेडकरी चळवळीतील दिग्गज व लढवय्या नेत्याच्या मुलांपैकी एक उज्ज्वल व विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून कनिष्क कांबळे यांचे नाव सर्वाधिक पुढे येते.
दिवंगत माजी आमदार टी एम कांबळे यांच्या नंतर कनिष्क कांबळे यांनी स्वबळावर राजकीय शक्ती वाढवून आंबेडकरी चळवळीत स्वतःचे एक स्वतंत्र आणि स्वाभिमानी अस्तित्व निर्माण केले आहे, या व अन्य गुणांना पाहून राजकीय गोटात राज्यपाल नियुक्त आमदारकी साठी कनिष्क कांबळे यांच्या नावाला पसंती येत आहे.


विधानसभा निवडणुकीत आर पी आय डेमॉक्रॅटिक हा कनिष्क कांबळे यांचा पक्ष कॉंग्रेस सोबत तर लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत अधिकृत युती करून रणांगणात होता आणि दोन्ही पक्षासोबत अत्यंत घनिष्ट संबंध आहेत त्यामुळेच की काय कनिष्क कांबळे यांची वर्णी लागली असावी असेही चर्चिले जात आहे.
सदर चर्चेबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधून चर्चेचा खुलासा केला तेंव्हा डॉ. माकणीकर यांनी सकारात्मक अविर्भाव आणला मात्र अधिकृत अशी माहिती अजून आली नसून चर्चा होत असल्याचे सत्य आहे असे स्पष्टीकरण दिले व युवा शक्ती व इंजिनीअर असलेल्या व्यक्तीला आमदारकी मिळाल्यास खऱ्या अर्थाने आमदार या पदाला न्याय मिळेल असेही डॉ. माकणीकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *