लोहा / प्रतिनिधी
लोहा व कंधार तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या फळबाग पिकाचे पंचनामे प्रशासनाने तात्काळ करावे अशी मागणी शिवसेनेचे लोहा -कंधारचे नेते बाळासाहेब पाटील कराळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पुढे असे नमूद केले की गेल्या सप्टेंबर महिन्यात लोहा व कंधार तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व ढगफुटी होऊन शेतकऱ्याच्या खरीप पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे प्रशासनाने केले आहेत परंतु त्याचबरोबर फळबाग पिकाचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे तेव्हा त्यांचे अद्याप पर्यंत पंचनामे झाले नाहीत राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांनी खरीप पिकांना हेक्टरी दहा हजार रुपये तर फळबाग पिकाला हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई अनुदान जाहीर केली आहे.
त्यांच्या या निर्णयाचे राज्यात सर्व शेतकऱ्याकडून जोरदार स्वागत होत आहे त्यांचे अभिनंदन होत आहे आम्ही लोहा व कंधार तालुका तालुक्याच्या वतीनेही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे स्वागत करतो अभिनंदन करतोत. त्याचबरोबर लोहा तालुक्यात खरीप पिकाचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहेत परंतु फळबाग पिकाचे अद्याप पर्यंत पंचनामे झाले नाहीत तेव्हा शासनाच्या अनुदानापासून फळबाग उत्पादक शेतकरी वंचित राहू नये त्यासाठी लोहा व कंधार तालुक्यातील महसूल व कृषी विभागाने तात्काळ फळबाग पिकाचे पंचनामे करून फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनाही शासनाच्या वतीने हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून अनुदान मंजूर करून द्यावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे लोहा- कंधार चे नेते बाळासाहेब पाटील कराळे यांनी केली आहे.