नांदेड ; प्रतिनिधी
कोरोना काळात डॉक्टर, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस कर्मचारी,आशा वर्कर ,स्वच्छता कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी आपली सेवा बजावत केलेले कार्य कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महत्वाचा ठरले, त्यामुळेच कोरोना या महामारीला रोखण्यास आपणाला यश येत असून त्यांच्या कार्याची नोंद भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने घेवून त्याचा व नवदुर्गा यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला असल्याचे प्रतिपादन
भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले.
दि.१ नोव्हेंबर रोजी मुदखेड येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नांदेड च्या वतीने कोरोना योद्धे व नवदुर्गा यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी प्रणिताताई देवरे चिखलीकर बोलत होत्या.यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नांदेड च्या जिल्हाअध्यक्षा सौ. चित्राताई गोरे,युवती मोर्च्या च्या जिल्हाध्यक्ष सौ.प्रियांका खांडेकर, ओ बी सी जिल्हाध्यक्ष अर्चना बरगले, ब्रह्मकुमारी जी पूजा दिदी, भोकर विधानसभा अध्यक्ष भाजपा निलेश देशमुख ,मुदखेड भाजपचे अध्यक्ष शंकरराव मुक्तलवाड,जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा सौ.केतकी चौधरी, तालुका अध्यक्ष महिला मोर्चा सौ.जयश्री देशमुख,शहराध्यक्ष महिला मोर्चा सौ.दिपाली गोडसे,युवती मोर्चा च्या तालुका अध्यक्ष मुदखेड सौ.मेदना गोदरे,वर्षा ताई चांदरे, सुनीता मागुळकर, रेणुकाबाई पवार, कैलास पाटील शिंदे, गणेशराव यळभकर लक्ष्मणराव इंगोले, बालाजीराव स्वामी, गोविंदराव गोपणपले, मुन्ना भाऊ चांडक देवा धबडगे, संजय पवार ,अशोकराव पवार, शंकर पवार ,गोविंद गोदरे, सोमेश मांगुळकर, गजानन कांबळे ,कुणाल चौधरी ,सुधाकर कदम, सचिन पाटील कल्याणकर सह प्रमुख कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी डॉक्टर, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस कर्मचारी,आशा वर्कर ,स्वच्छता कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचा कोरोनायोद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.