माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिसानिमित्त कंधार येथिल गरजू विद्यार्थीना शालेय साहित्य व मास्कचे वाटप

कंधार ;प्रतिनिधी

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कंधार येथिल विवेकानंद नगर लेक्चरर कॉलनी येथे गरजू विद्यार्थीना शालेय साहित्य व मास्कचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

तसेच हातावर सँनेटाईजर मारुन हात धुण्यात आले व स्वच्छतेचा संदेश देण्यात आला़ .यावेळी कार्यक्रमास महिला कॉग्रेस महिला आघाड़ी तालुका अध्यक्ष आशाताई गायकवाड ,प्राचार्या सौ.राजश्रीताई शिंदे ,महिला शहर अध्यक्ष सौ. अनुसयाताई पुलकुंडवार,सौ, शेषेकला कुरुडे, सौ.नंदा कुराडे,सौ. इंदू गोरे,सौ पुजा आम्लापूरे, सौ कोमल पुलकुंडवार, सौ.पुनम शिंदे, सौ.पंचफुला लुंगारे आदी महिलांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी कार्यक्रमास महिला कॉग्रेस महिला आघाड़ी तालुका अध्यक्ष आशाताई गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कार्याची माहीती व कॉग्रेस चे ध्येय धोरण याबाबत माहीती देत प्रात्यक्षिकातून स्वच्छता ही काळाची गरज असल्याचा संदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *