कंधार लोहा मतदारसंघातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांतील मराठा कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

कंधार ; दिगांबर वाघमारे

अनेक राजकीय पक्षातल्या व सामाजिक संघटनातील मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आज दि.४ नोव्हेंबर रोजी कंधार येथे वंचित बहुजन आघाडी प्रवेश केला आहे.

श्रदेय नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांच्या नेतृत्वात कंधार येथे वंचित बहुजन आघाडीचे संपर्क कार्यालय शिवालय येथे कंधार – लोहा मतदारसंघातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला आहे.

राज्यात वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेशाची शृंखला जोरात सुरू असून आज नांदेड जिल्ह्यातही ऐतिहासिक कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला आहे. कंधार येथे संपन्न झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यास वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद, गोविंद दळवी , जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, महासचिव शाम कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्यांना रीतसर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी ग्रा. प. सदस्य ग्रा. प. देठणा राम पाटील आनकाडे, शिवराज पाटील मोरे सरपंच मडकी, दिलीप पाटील भोपाळे सरपंच भोपाळवाडी, विलास पाटील सांगवे युवा सेना तालुका संघटक, अमोल देशपांडे मनसे शहराध्यक्ष कंधार, एकनाथ पाटील कदम, हनुमंत पाटील दंडवे. बळीराम आहेरकर, गोविंद पाटील शिंदे, मियाभाई शेख , राजेश दिगंबर इंगोले , तालुका अध्यक्ष छावा विद्यार्थी आघाडी, रवी पाटील घोरबांड तालुका संघटक मराठा महासंग्राम,

विलास पाटील इंगोले, सुभानजी जाधव सरपंच लाठ (खुर्द ) गौतम जाधव , साहेबराव सोनवणे, प्रभाकर भुरे सरपंच दाताळा , प्रभाकर वडवळे, चंद्रशेखर गव्हाणे , हनुमंत हळदे, अंकुश हळदे, इत्यादींनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना राज्य प्रवक्ते गोविंद दळवी म्हणाले की , विस्थापितांना प्रस्थापित करण्याची चळवळ म्हणजे वंचित बहुजन आघाडी असून शेकडो वर्षापासून वंचित राहिलेल्या जात समूहांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे. यावेळी प्रवक्ते फारूक अहमद यांनीही आपली भूमिका मांडली. केवळ स्वतःच्या हितासाठी येथील व्यवस्थेने जाती – जाती धर्मा – धर्मात तेढ निर्माण केले असून आता या स्वार्थी प्रस्थापितांची नीती जागरूक तरूणाने ओळखावी व शिवरायांचे व युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचाराचे वारस असलेल्या अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कंधार – लोहा तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका असून या तालुक्यात बहुजन मावळ्यांची मोट बांधून येणाऱ्या विधानसभेला वंचित बहुजन आघाडीचा झेंडा या मतदारसंघात फडकवू असा निर्धार व्यक्त केला. महासचिव शाम कांबळे यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला संतोष पाटील गवारे, धुराजी पाटील डावळे, माणिक ढवळे , सुनील मोरे , बबन जोंधळे , भास्कर कदम, विहान पाटील कदम, चंद्रशेखर गायकवाड मोहसीन बागवान, सौरभ पवार, दयानंद कदम , रत्नाकर वाघमारे,आदींची उपस्थिती होती .

***-Video News*** वंचित बहुजन आघाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *