ओबीसी जनगणना वेलफेयर मिशन व ओबीसी संघर्ष समिती नांदेड तर्फे राज्यस्तरीय आंदोलन

नांदेड ;

भारतीय पिछडा शोषित ओबीसी संघटना,ओबीसी जनगणना वेलफेयर मिशन व ओबीसी संघर्ष समिती नांदेड तर्फे आज राज्यस्तरीय आंदोलन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर करण्यात आले.
या आंदोलनाचे संपर्क प्रमुख राजेश रापते यांच्या सह आंदोलकांनी तपस्वी डॉ- रामराव महाराज पोहरादेवी संस्थांन प्रमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली.
आज हे महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागातून टोकन आंदोलन असून येणाऱ्या 10 नोव्हेंम्बर रोजी मुंबई येथे राऊंड टेबल कॉन्फरन्स घेऊ आणि तरीही ओबीसींची जात निहाय जनगणना न झाल्यास, त्यातूनही काही फलित न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल याची नोंद महाराष्ट्र शासन व प्रशासनाने घ्यावी असा इशारा आंदोलकांनी दिला.
या आंदोलनात डॉ.बी डी चव्हाण,ओबीसी नेते बालाजी शिंदे,प्रकाश राठोड,रावसाहेब चव्हाण,वेंकटराव पार्डीकर, रामेश्वरबाबा गोडसे बारडकर,गोविंद फेसाटे, नंदकुमार कोसबतवार,राजेश चितकुलवर,सौ मंगला साखरे हे यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *