लोहा (प्रतिनिधी ) :
नांदेड दक्षिण मतदार संघाचे कार्यशील आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या प्रयत्नातून कारेगाव येथील शेतकऱ्यांना हरणामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसानभरपाई मिळाली.
नांदेड दक्षिण मतदार संघातील कारेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हरणाचे कळपच्या कळप येऊन उभ्या पिकांचे नुकसान करत होते. हाताशी आलेल्या सोयाबीन सारख्या नगदी पिकांचे हरणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आधीच मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास एकापाठोपाठ एक आलेल्या संकटामुळे हिरावून जात असताना हरणांच्या कळपामुळे नुकसान झालेले हे वेगळे संकट शेतकर्यांसमोर उभे टाकले. याबाबत येथील शेतकऱ्यांनी आमदार हंबर्डे यांना भेटून संबंधित नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळण्याची मागणी केली होती.
यासाठी आमदार हंबर्डे व पंचायत समिती सदस्य श्रीनिवास मोरे यांनी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिली. यामध्ये दिगंबर केशव किरवले, हनुमंत दिगंबर किरवले, प्रल्हाद दिगंबर किरवले, गणेशराव शेषराव मोरे , मोतीराम दौलू किरवले, सोपान प्रभाकर किरवले, भगवान शंकर किरवले, जगन्नाथ नरोजी किरवले, सूर्यकांत केरबा किरवले आदी शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे नुकसान भरपाई मिळाली. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी रेंज ऑफिसर काळे आणि शेळके यांनीही मार्गदर्शन केले.
दरम्यान आमदार हंबर्डे यांनी केलेल्या प्रयत्नाला यश मिळाल्यामुळे कारेगाव येथील शेतकर्यांनी आमदार हंबर्डे यांचे आभार मानले.