पारडी येथे त्रिवेणी बायोक्लीन प्रा. लि.चा भूमिपूजन सोहळा संपन्न
लोहा, प्रतिनिधी
शिवसंग्राम ग्राम सेवा प्रोजेक्ट शेतकऱ्यासाठी चांगला उपयुक्त आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या तथा जि .प. सदस्या सौ. प्रणिताताई देवरे -चिखलीकर यांनी पारडी येथे त्रिवेणी बायो क्लीन प्रा.लि. च्या शिवसंग्राम ग्रामसेवा प्रोडयूसर
कंपनीच्या उदघाटन प्रसंगी केले.
लोहा तालुक्यातील मौजे.पारडी येथे वाळकेवाडी रोडवर शिवसंग्राम ग्रामसेवा प्रोडयूसर कंपनी लिमिटेडचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम आज दि.४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सुकन्या जलयुक्त शिवार व पाणी फाउंडेशन चळवळीच्या प्रणेत्या सामाजिक कार्यकर्त्या तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रणिताताई- देवरे चिखलीकर होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कृषी अधिकारी माणिकराव मुकदम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोहा पंचायत समितीचे सभापती आनंदराव पाटील शिंदे, उपसभापती नरेंद्र गायकवाड, सेवानिवृत्त लोहा तालुका कृषी अधिकारी विश्वंभर मंगनाळे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुशराव पाटील कदम, लोहा नगरपालिकेचे उपाध्यक्ष शरद पाटील पवार, नगरसेवक भास्कर पाटील पवार, नगरसेवक पंचशील कांबळे, नगरसेवक दत्ता वाले,ह.भ.प. पुरण महाराज सोनखेडकर, कंपनीने संचालक संग्राम डूबचकवड, संचालक मधुकर पाटील पवार , कार्यक्रमाचे आयोजक सुधाकर पाटील पवार, शहाजी पाटील पवार ,पारडीचे पॅनल प्रमुख माधव पाटील पवार, सरपंच राम पवार दिपक पाटील कानवटे,, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर म्हणाल्या की या प्रोजेक्टचे लोहा- कंधार मध्ये मी स्वागत करते हा बहुउद्देशीय प्रोजेक्ट आहे मुंबई पुण्याला जाण्याची येथील तरुणाला गरज नाही येथेच रोजगारनिर्मिती होणार आहे .
या प्रोजेकटला शेतकरी सुद्धा भरभरून साथ देतील या प्रोजेक्टमुळे कचरा मुक्त शिवार योजनेची निर्माती होईल खताची निर्मिती होईल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व आत्मनिर्भर बनण्यासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे. खरोखरच आज येथील शेतकरी कष्टकरी कामगार हा कोरोना संकटात सापडलेला आहे भोळीभाबडी जनता ही पारंपरिक शेती करतात त्यांना रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खताचा वापर करावा आजारावर कोणते औषध घ्यावे व आजार काय आहे हे ओळखता आला पाहिजे तसेच घनकचऱ्यापासून काडी कचरा पासून तयार होणाऱ्या या प्रकल्पाचा नक्कीच उपयोग होईल. पुणे मुंबई येथून आलेल्या बेरोजगारांच्या हाताला सुद्धा यामुळे काम मिळेल असे सौ. प्रणिताताई देवरे -चिखलीकर म्हणाल्या.
यावेळी कार्यक्रमाला लोहा,पारडी,व परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत कर्जावार यांनी केले तर सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी केले. व आभार सुधाकर पाटील पवार यांनी मानले .