पानशेवडी येथिल जिल्हा परीषद शाळेला गटशिक्षणअधिकारी रविंद्र सोनटक्के यांनी भेट देवून घेतला आढावा
कंधार ; डॉ.माधवराव कुद्रे
कोरणा काळामध्ये नांदेड जिल्ह्यासह तालुक्यात सर्व शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने शाळा भेटी देण्याचे आदेश काढले असून वर्क फ्रॉम होम अध्यापन चालू असताना स्वतः गटशिक्षणअधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी दिनांक ४ ऑगस्ट रोजी कंधार तालुक्यातील पानशेवडी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन अध्यापन बाबत उपाययोजनाची पाहणी करून झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले व मुख्याध्यापिका सौ.निलीमा यंबल यांच्या कार्याचे कौतुक केले.
दि.४ अॉगस्ट रोजी वर्क फ्रॉम होम अध्यापन चालू असताना अकस्मात पानशेवडी जि.प.शाळेला गटशिक्षणअधिकारी रवींद्र सोनटक्के भेट दिली.शाळेत चालु असलेले सोशल मिडीया चा ग्रुप करुन त्यामध्ये दररोज दिनदर्शकिप्रमाणे ,तासिके प्रमाणे नियोजन करुन दररोज त्यावरुन दिलेल्या अभ्यासाची पाहणी करावी व आवश्यक त्या प्रमाणे विद्यार्थी भेटी घेवून मार्गदर्शन करण्याचे गटशिक्षणअधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी आवाहन केले.यावेळी मुख्याध्यापिका सौ.निलीमा यंबल यांच्या कार्याची पाहणी करुन समाधान व्यक्त केले शाळेच्या इमारतीची पाहणी केली.यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी सौ.अंजली कापसे ,केंद्रप्रमुख केंद्रे , राजहंश शहापुरे ,प्रजाल शिंदे ,राम सोनकांबळे आदीची यावेळी उपस्थिती होती.