शताब्दी जयंती महोत्सवानिमित्य कंधार शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा – राष्ट्रवादी युवक कॉग्रेसची मागणी
कंधार ;साईनाथ मळगे
साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचे २०२० हे जन्मशताब्दी वर्ष आहे.कंधार शहरात अण्णाभाऊ साठे यांचा सद्या अर्धकृती पुतळा आहे. त्यांच ठिकाणी त्यांचा पूर्णकृती पुतळा उभारल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेल व येणार्या पिडीस आर्दश ठरेल यासाठी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारुन त्यांना आदरांजली वाहण्यात यावी व संबंध बहुजन समाजाला दिलासा देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने दि.५ अॉगस्ट रोजी तहसिलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,गृहमंत्री अनिल देशमुख,पालकमंत्री अशोक चव्हाण,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे,किसान भारती प्रदेशध्यक्ष तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे,राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे,उपविभागीय अधिकारी कंधार,पोलीस उपविभागीय अधिकारी कंधार,मुख्याधिकारी नगर परिषद कंधार,पोलीस निरिक्षक कंधार यांना निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष राजकुमार केकाटे,ता.उपाध्यक्ष न्यानोबा घुगे,सरचिटणीस संतोष कागणे,गोपीनाथ केन्द्र,बंडु गिते, शिवाजी मुंगरे आदीची यावेळी उपस्थिती होती.