कंधार 🙁 दिगांबर वाघमारे )
राष्ट्रसंत वसुंधरारत्न श्री ष.ब्र. १०८ डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या कृपा आशिर्वादाने, ष. ब्र. १०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठसंस्थान मुखेड यांच्या प्रेरणेने , कंधार तालुक्यातील मौजे पागरा येथे दि.22 ते 28 जानेवारी या कालावधीत शिवकथेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यकमाचा लाभ घेण्याचे आवाहन पांगरा गावकऱ्यांच्या वतीने राजू पाटील पांगरेकर यांनी केले आहे.
साधारणपणे कार्यक्रमाची रूपरेषा मध्ये सकाळी ५ ते ६ शिवपाठ, दुपारी १२ ते ०३ शिवकथा, सायकांळी ६ ते ७ शिवपाठ, डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांचे प्रवचण, शि.भ. प. सौ. गंगासागर चंद्रशेखर पुरे शिंगारवाडीकर यांचे दिनांक. २८-०१-२०२६ रोजी बुधवार रात्री ९ ते ११ वाजता शिव किर्तन आहे.आरतीचे मानकरी व अन्नदाते म्हणून माधवराव बापुराव कौसल्ये,गोंविदराव नारायणराव पाटील,रामदयालसिंह बंकटसिंह ठाकुर,गंगाधरराव निवृती पा. बेंद्रे,विठ्ठलराव शेषेराव कोंडे, माधवराव शेषेराव मेरे,बालाजीराव पांडुरंग लालमे आदीनी सहकार्य केले आहे.पांगरा येथे सुरू असलेल्या सर्वधर्मीय अखंड शिवनाम शिवकथा. ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळ्यातील कथाकार म. नि. प्र. संगणबसव महास्वामिजी निलंगा यांचे
राजू पाटील पांगरेकर यांनी पूजन करून आशीर्वाद घेतला.

